आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणाची क्षमता नेमकी किती? राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - जायकवाडी धरणात ६५% पाणी गेल्यावर धरणात पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, असे मेंढगीरी समितीने म्हटले आहे. मात्र धरणाच्या क्षमतेचे विविध आकडे समोर आणून संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी जायकवाडी धरणाची क्षमता नक्की किती आहे, हे सरकारनेच तपासण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले अाहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बाेलत हाेते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते आण्णासाहेब जमधडे पाटील होते.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, राहाता तालुक्यातील शेतीव्यवस्था पाटपाण्यावर अवलंबून आहे. धरणे भरली, नदीही ओव्हरफ्लो हाेऊन वाहून गेली. जायकवाडीतही भरपूर पाणी वाहून गेले. मात्र या भागातील उभी पिके पाण्यावाचून होरपळून चालली आहे. त्यातच जायकवाडीच्या पाण्याबाबत संभ्रम कायम आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यात मुलभूत बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचा निकालाची वाट पाहावी लागेल. मात्र सरकार दुष्काळी परिस्थीतीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात नाही, हे मोठे दुर्दैव्य आहे. यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची पिके वाया गेल्याने या पिकांचे पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आम्ही करीत होतो, पण तत्कालीन कृषीमंत्री एकनाथ खडसे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर त्यांना शेतकऱ्यांचा तळतळाट भोगावाच लागला आणि मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. सद्यस्थितीतही शेतकरी विरोधीच भूमिका राज्य सरकार घेत असल्याने प्रभावी उपाययोजना करत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे, असेही ते म्हणाले. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये ऑनलाइन करून सरकारी योजनांचा फायदा गोरगरीब जनतेला करून देण्याच्या सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बातम्या आणखी आहेत...