आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेत बाण मारणाऱ्यांचे विकासात योगदान काय? आमदार थोरात यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात.
संगमनेर - जायकवाडीला पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आवश्यक आहे, याचा हिशेब करताच साडेबारा टीएमसी पाणी जात असल्याने याविरोधात सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन करत असताना काही लोक मात्र हवेत चुकीचे कागदी बाण मारत आहेत. तालुक्याच्या विकासात कोणतेही योगदान नसलेले हे लोक तुम्हाला माहिती असून ते दिशाभूल तुमची करत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ गुरुवारी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे होते. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, मधुकर नवले, भाऊसाहेब कुटे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, समन्यायी पाण्याचा कायदा २००५ मध्ये झाला असली, तरी सप्टेंबर २०१४ मध्ये अधिकाऱ्यांनी निवडणुकांचा काळ असताना आणि सरकार सत्तेत नसताना सर्वांना अंधारात ठेवून फेरदुरुस्ती केली आणि हा कायदा पूर्ण राज्याला लागू झाला. पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयाचे आदेश आहे. पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, याचा हिशोब करता केवळ दबावातून जायकवाडीसाठी साडेबारा टीएमसी पाणी नगर-नाशिकमधून सोडले गेले.

न्याय निश्चितपणे मिळेल
अडचणीवर मात करत कारखाना यावेळीही अग्रस्थानी राहील. समन्यायी पाणीवाटप कायद्याचा चुकीचा अर्थ लावत खोट्या आकडेवारीच्या आधारावर येथील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवत अधिकारी पाणी खाली नेत आहे, हे न्यायाला धरून नाही. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला न्याय निश्चितपणे मिळेल. डॉ.सुधीर तांबे, आमदार.
वीस टक्के बोनस, महिन्याचे वेतन
कामगारआणि कार्यकर्ते यांच्यात आपण कधीही फरक केला नाही. मी हे एक कुटुंब मानतो. त्यामुळे कारखान्यासमोर अडचणीचा काळ असला, तरी यावेळीही कामगार, कर्मचाऱ्यांना वीस टक्के बोनस आणि एक महिन्याचे वेतन थोरात कारखान्याकडून दिवाळीसाठी देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
एफआरपीमुळे बोजा वाढला
एफआरपीमुळे कारखान्यावर दोन वर्षांत ४७ कोटींच्या कर्जाचा बोजा पडला आहे. पाऊस नाही, दुष्काळी स्थिती, जायकवाडीला हक्काचे पाणी जात आहे, अशा स्थितीत कारखान्याचे गाळप होत असल्याने अतिशय अडचणीचा डोंगर समोर उभा आहे. दोन्ही सरकारे साखर कारखानदारी विरोधात भूमिका घेताना दिसतात. माधवराव कानवडे, अध्यक्ष, थोरात कारखाना.
बातम्या आणखी आहेत...