आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉटस् अॅप ग्रुप सरसावले दुष्काळग्रस्तांच्या मदतीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थिक मदत देण्यासाठी सोशल मीडियावरील काही ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. व्हॉटस् अॅपवरील एकता सेवा मंच समाजकारण या ग्रुपवरील सदस्यांनी एकत्र येऊन दुष्ळाग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतनिधी गोळा केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास ११ हजारांची मदत या ग्रुपच्या वतीने देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सुमारे ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत, त्यांच्या कुटंुबांना आधार देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक एकत्र आले आहेत. एकता सेवा मंच समाजकारण या दोन ग्रुपवरील सदस्य सुमीत वर्मा, दीपक कावळे, अजय औसरकर, प्रवीण ढोणे, दत्ता गाडळकर, सुवेंद्र गांधी, गुड्डू खताळ, सतीश धाडगे, बाबासाहेब गाडळकर, संपत नलावडे, निखिल वारे, दत्ता जाधव, संभव काठेड, शुभम मेहेरे, राेहित बलदोटा, सिद्धार्थ कांकरिया, रवींद्र गांधी, शुभम गांधी आदींनी एकत्र येऊन मदतनिधी गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. सोशल मीडियाकडे एरवी वादविवाद अथवा करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. मात्र, सोशल मीडियाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी होऊ शकतो, हे व्हॉटस् अॅपवरील या दोन ग्रुपने दाखवून दिले. शहरातील गणेश मंडळांनी प्रत्येकी हजार रुपये मदतनिधी द्यावा, असे आवाहन या ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. मदतनिधीची रीतसर पावतीदेखील देण्यात येणार आहे.
अभिनेते मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांना एकता सेवा मंच समाजकारण ग्रुपची माहिती देताना सुमीत वर्मा, दीपक कावळे, अजय औसरकर आदी.

नाना, मकरंदची भेट
एकतासेवा मंच समाजकारण ग्रुपच्या सदस्यांनी अभिनेते नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांची प्रेरणा घेऊन मदतनिधी गोळा करण्यास सुरुवात केली. गोळा झालेला मदतनिधी नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणार असल्याचे सुमीत वर्मा यांनी सांगितले. त्यासाठी वर्मा यांच्यासह आदित्य अानेचा, मोहित बोरा आदींनी नाना मकरंदची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांनीही ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक करून अहमदनगरला येण्याचे कबूल केले.