आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"व्हॉट्स अॅप'वर "डीजे'ला परवानगी दिल्याच्या अफवांचे संदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "खुशखबर!खुशखबर! खुशखबर! अखेर पोलिस प्रशसनाने गणेश भक्तांची मागणी मान्य केली. शेवटचे तीन दिवस डीजे वाजवायला परवानगी दिली. आता डीजे तर वाजणारच. एसपी साहेब आभारी आहोत. वाजवा रे वाजवा..'' अशा अफवा पसरवणारे संदेश सध्या "व्हॉट्स अॅप' सोशल मीडियावर फिरत आहेत. प्रत्यक्षात मात्र, पोलिस अथवा जिल्हा प्रशासनाने अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे गणेशोत्सवात अफवांवर विश्वास ठेवून कोणीही कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करू नये, असे आवाहन पोलिस जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत सर्व जातीधर्मांतील उत्सवांना लागू राहतील, असे आदेश पारित केलेले आहेत. रात्री १० ते सकाळी वाजेपर्यंत फटाके, लाऊडस्पिकर, वाद्य इत्यादींच्या वापरावर बंदी राहील. ही वेळ वर्षातील फक्त १५ दिवस, मध्यरात्री १२ पर्यंत सरकार वाढवू शकते.
लाऊडस्पिकरचा अवाजवी वापर झाल्यास परवानगी रद्द करण्याचा अधिकार संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना आहे. त्यासाठी नागरिक जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये किंवा १०० या क्रमांकावर पोलिसांकडे तक्रार नोंदवू शकतात. आपापल्या हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांकडेही नागरिक थेट तक्रार करू शकतात.

चांगले विनाअडथळे रस्ते हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे जर मंडप घातल्यामुळे वाहतुकीला अडथळा येणार असेल, तर एक तृतीयांश भागातही मंडप घालता येणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला होता. प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचा हक्क असला, तरी मोठे मंडप घालून रस्ता अडवणे, मोठे स्पिकर, ढोल याद्वारे ध्वनिप्रदूषण करणे, या हक्कांमध्ये अजिबात बसत नाही.

सर्व नागरिकांनी सण, उत्सव साजरे करताना कायद्याचा नियमांचा भंग होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अफवा पसरवणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील १२ गुंड तडीपार
पोलिसप्रशासनाने १२ गुंडांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्यात वाळूतस्करांचाही समावेश आहे. जणांचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांनी अलीकडेच मंजूर केले आहेत. इतर गुन्हेगारांचे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत.

१६ यंत्रे उपलब्ध
ध्वनिप्रदूषणरोखण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. डीजे वाजल्यास जप्त करण्याची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. डीजेच्या आवाजाची तीव्रता ५६ डेसीबलपेक्षा कमी नसावी. पण, कोणत्याही डीजेची ध्वनिमर्यादा त्यापेक्षा कमी नसते. त्यामुळे डीजेला परवानगीच देणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात सध्या २९७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर, ध्वनिमर्यादा मोजण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे १६ यंत्र उपलब्ध आहेत. ही संख्या कमी असली, तरी डीजे साऊंडच्या वॉल मिरवणुकीत येणार नाहीत, यादृष्टीने पोलिस जिल्हा प्रशासनाने आतापासूनच जय्यत तयारी केलेली आहे.

कोर्टाच्या नावाने अफवा
"व्हॉट्सअॅप'वर एक संदेशात, तर थेट उच्च न्यायालयाने डीजेवाल्यांच्या बाजूने िनकाल दिला, असे म्हटले आहे. डीजे लावण्यास परवानगी द्यावी, असे पोलिस अधिकाऱ्यांनाच सुनावल्याचे त्यात म्हटले आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही, तर उच्च न्यायालयाला कळवावे, असा आदेश दिल्याचेही म्हटले आहे. सर्वांनी बेस, टॉप लावावेत, असे अावाहन करण्यात आले आहे. मात्र, याबाबत कोणतीही आदेशाची प्रत जोडलेली नाही. सोशल मीडियावर फिरणारा हा संदेश सुद्धा एक अफवाच असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा "सायबर सेल'चे पोलिस कसून शोध घेत आहेत.

नेत्याचा व्हिडिओ जुनाच
पश्चिममहाराष्ट्रातील एका खासदाराचा व्हिडिओ सध्या "व्हॉट्स अॅप'वर "व्हायरल' झाला आहे. त्यात खासदार पोलिस अधिकाऱ्याला खडे बोल सुनावताना दिसतात. गणेशभक्तांना डीजेच्या तालावर नाचण्यापासून कोण रोखतो ते मीच पाहतो, असा खणखणीत इशारा ते देतात. व्हिडिओसोबत डीजेला परवानगी दिल्याचेही जाणीवपूर्वक पसरवले आहे. मुळात हा व्हिडिओ खूप जुना आहे. भावना भडकावण्याच्या दृष्टीने तो जाणीवपूर्वक पसरवला आहे. या व्हिडिओवर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलिसांच्या "सायबर सेल'ने केले आहे. हा व्हिडिओ पाठवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.

२९७ जिल्ह्यात एकूण सार्वजनिक गणेश मंडळे
१६ पोलिसांकडे उपलब्ध ध्वनीमर्यादा मापक यंत्रे
५६ डेसीबलपर्यंतच कमाल ध्वनीमर्यादा

परवानगी दिलेलीच नाही
घटनेनेप्रदान केलेला जगण्याचा अधिकार म्हणजे किडे-मुंगीसारखे जगणे नाही, तर सन्मानाने स्वखुषीने शांत वातावरणात जगणे होय. जसे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तसे इतरांना तुमचे बोलणे ऐकण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे लाऊडस्पिकरवरून मोठ्याने गोंगाट करणे, हे बेकायदेशीरच आहे. काही समाजकंटकांकडून जाणून बुजून अफवा पसरवल्या जात आहेत. पोलिस दलाने शेवटचे दिवस डीजे वाजवण्यास अजिबात परवानगी दिलेली नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्यास पोलिस बांधिल आहेत. त्यामुळे अफवा परसवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.'' डॉ.सौरभ त्रिपाठी, पोलिस अधीक्षक.