आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हाचे क्षेत्र घटले; उत्पादनावर परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - थंडी कमी झाल्याने रब्बी हंगामात गव्हाच्या लाख १५ हजार ५२६ हेक्टरवरील पेरण्या लांबणीवर पडल्या अाहेत. आतापर्यंत केवळ २१ हजार ६०४ हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. आता गव्हाच्या पेरण्या होण्याची शक्यता कमी असल्यामुळे आगामी काळात गव्हाचे भाव गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत.

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने रब्बीच्या पिकांना दिलासा मिळाला असला, तरी आता रब्बी हंगामातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. नगर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र लाख ८७ हजार ९४० हेक्टर आहे. यंदा लाख ६० हजार २२५ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक लाख १९ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या पेरण्या समाधानकारक असल्या, तरी ज्वारीची ५० टक्के पिके आता पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

ज्वारीच्या क्षेत्रात यंदा २० हजार हेक्टरने वाढ झाली असली, तरी गव्हाच्या पेरण्या मात्र अजूनही समाधानकारक झालेल्या नाहीत. जिल्ह्यात गव्हाचे लाख ३७ हजार १३० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी केवळ २१ हजार ६०४ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरण्या झाल्या आहेत. अजून लाख १५ हजार ५२६ हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. आगामी काळात गव्हाच्या पेरण्या होण्याची शक्यता कमी आहे.

गव्हाबरोबरच मकाच्या पेरण्याही पाण्याअभावी लांबणीवर पडल्या आहेत. जिल्ह्यात मक्याचे १२ हजार ६२० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी हजार ६३४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यंदा सर्वाधिक हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या कोपरगाव तालुक्यात झाल्या आहेत. मक्याच्याही याच तालुक्यात सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. त्याखालोखाल नेवासे तालुक्यात हजार ९६५ हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झाल्या असून, सर्वात कमी जामखेड तालुक्यात २६७ हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. मक्याच्या पेरण्या पारनेर वगळता अन्य तेरा तालुक्यांमध्ये झाल्या आहेत.

यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा केवळ अर्धा टक्के गव्हाच्या पेरण्या झाल्यामुळे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे बाजारात गव्हाची आवक कमी होऊन भाव आणखी वाढणार आहेत.

तालुकानिहाय गव्हाच्या पेरण्या
नगर ४३९ हेक्टर, पारनेर २७७०, श्रीगोंदे ४५०, कर्जत ६६१, जामखेड २६७, शेवगाव ८६०, पाथर्डी २५४०, नेवासे २९६५, राहुरी १५१३, संगमनेर ११८५, अकोले १८५०, कोपरगाव ३८५४, श्रीरामपूर २०३६ राहाता २२४ हेक्टर क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत.

यंदा जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र दुपटीने वाढले
जिल्ह्यातीलबहुतांशी तालुक्यांत कांद्याचे पीक घेतले जाते. कांद्याचे एकूण क्षेत्र ६३ हजार हेक्टर आहे. खरीप, लेट खरीप रब्बी हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते. आतापर्यंत लाख १५ हजार ६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप, लेट खरीप रब्बी हंगामात कांद्याची लागवड झाली आहे. उन्हाळी कांद्याचे पीक येणे बाकी आहे. यंदा कांद्याचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे.
बातम्या आणखी आहेत...