आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले, विडी कामगार महिलांचा धडक मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जमलेल्या विडी कामगारांना मार्गदर्शन करताना संघटनेचे पदाधिकारी. छाया: उदय जोशी. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जमलेल्या विडी कामगारांना मार्गदर्शन करताना संघटनेचे पदाधिकारी. छाया: उदय जोशी.
नगर- विडी कारखाने बंद असल्याने बेरोजगार झालेल्या विडी कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याने आंदोलक पोलिसांमध्ये बाचाबाची धक्काबुक्की झाली. विडी कारखानदार सरकारमध्ये तडजोड करून तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली. सत्ताधारी भाजप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस वगळता सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही सरकारविरोधात तोफ डागली.
विडी बंडलांवर धोक्याचा इशारा देणारे ८५ टक्के चित्र छापण्याची अट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एप्रिलपासून बंधनकारक केली आहे. या अटीची पूर्तता करणे अशक्य असल्याचे कारण पुढे करत विडी कारखानदारांनी गेल्या दोन आठवड्यांपासून बेमुदत बंद पुकारला आहे. सरकार विडी कारखानदारांच्या वादात शहरातील पाच हजारांपेक्षा अधिक विडी कामगार, विशेषत: महिला बेरोजगार झाल्या आहेत. कारखाने बंद झाल्यापासून कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

सकाळी नियोजन भवनाच्या खाली आंदोलक महिला जमल्या. त्यानंतर आलेल्या आंदोलकांना प्रवेशद्वाराबाहेरच रोखण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याचे सांगून त्यांना बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. संघटनेच्या नेत्यांनी आतील महिलांना बाहेर बोलावून रास्ता रोको आंदोलन केले. कोतवाली पोलिसांनी विडी कामगार संघटनेचे शंकर न्यालपेल्ली अॅड. सुभाष लांडे यांना ताब्यात घेऊन गाडीत बसवले. त्यामुळे आंदोलक महिला आक्रमक झाल्या. त्यांनी गाडी अडवून नेत्यांना सोडण्याची मागणी केली. आंदोलनासाठी आणलेले झेंडेही गाडीवर आपटले. यावेळी आक्रमक झालेल्या महिला आंदोलक पोलिसांमध्ये बाचाबाची धक्काबुक्की झाली. महिला पोलिसांची संख्या कमी असल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. पोलिसांनी अखेर नमती भूमिका घेत दोन्ही नेत्यांना सोडले.

मंत्र्यांच्या गाड्या अडवणार
गेल्यापंधरा दिवसांपासून, तसेच यापूर्वीही सातत्याने आंदोलने करूनही सरकार ताठर भूमिका घेत असल्याचे विडी कामगारांचे म्हणणे आहे. शांततापूर्ण आंदोलने करूनही सरकार कारखानदारांमध्ये तडजोड होत नसल्याने कामगारांमध्ये संताप आहे. यापुढे जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा इशारा विडी कामगार संघटनांनी यावेळी दिला. आंदोलन आणखी तीव्र करून सरकारला दखल घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सरकारचे डाेके ठिकाणावर नाही
शिवसेना सत्तेत असली, तरी कामगारांवर होणारा अन्याय सहन करणार नाही. गोरगरीब सर्वसामान्य महिलांच्या चुली बंद करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न उपस्थित करत माजी आमदार अनिल राठोड यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
पुढीसस्लाइड्सवर पाहा, आंदोलनाचे फोटोज