आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवाना फ्लेक्स; १२ जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणारे १२ जण कायद्याच्या कचाट्यात अडकले. हा प्रकार नेवासे तालुक्यातील खरवंडी गावात घडला. ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करणारा अधिनियम १९९५ च्या कलम नुसार गुन्हा नोंदवला. मंगळवारी खरवंडीची यात्रा होती. त्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.


राहुल नामदेव भोगे, महादेव शंकर ऊर्फ बाळासाहेब भोगे, विठ्ठल कचरु उदावंत, दत्तात्रेय नामदेव पंडित, अशोक कचरु मुरकुटे, नानासाहेब नारायण फाटके, सारंगनाथ रामभाऊ फाटके, हरि आदिनाथ भोगे, निवृत्ती शंकर भोगे, गोविंद सदाशिव भोगे, मच्छिंद्र माधव फाटके ज्ञानदेव गोपीनाथ कुऱ्हे (सर्व खरवंडी) अशी आरोपींची नावे आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या सरकारी जागेत आठवडे बाजार भरण्याच्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावला होता. ग्रामसेवक बाबासाहेब सुखदेव महाजन (हातगाव, ता. शेवगाव) यांनी फ्लेक्स बोर्ड काढून टाकायला सांगितला होता. तो काढला गेला नाही. त्यामुळे त्यांनी १३ एप्रिलला फिर्याद दिली. त्यानुसार सोनई पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बी. बी. ताके यांच्याकडे आहे. त्यांनी सोमवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...