आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा सन्मान करणारे पुरुष मनोरुग्ण, माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आई,मुलगी, बहीण, पत्नी, मावशी, आत्या, मैत्रीण यांचा सन्मान करणारे पुरूष एकप्रकारे मनोरूग्णच आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी बुधवारी सांगितले. महिला दिनानिमित्त नगर प्रेस क्लबच्या वतीने महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरग बोलत होते. मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मीनाताई मुनोत, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, डॉ. राहुल झावरे, कॉम्रेड रामभाऊ दातीर आदी यावेळी उपस्थित होते. स्वागत पत्रकार महेश देशपांडे यांनी केले. 

प्रास्ताविक शिल्पा रसाळ यांनी केले. मुनोत म्हणाल्या, महिला आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवत आहेत. दातीर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मन्सूर शेख यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देऊन प्रेस क्लबच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले. 
 
पाहुण्यांच्या हस्ते सायली लवटे, सुप्रिया भंडारी, ललिता उबाळे, मंजू भागानगरे, शिवानी धुमाळ, प्रतीक्षा काळे, राणी कासलीवाल, सुरेखा घोलप-भुकन, गुंजन शर्मा, पूजा साके, अर्चना झंवर, मनीषा जोशी-इंगळे, स्नेहा जोशी-कांबळे, प्रियंका चिखले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते. मिलिंद चवंडके यांनी आभार मानले. 
 
पत्रकारितेतून समाजहित 
पत्रकारिताहे समाजहिताचे साधन आहे. अलिकडे महिला मोठ्या प्रमाणात पत्रकारितेत येत आहेत. इंटरनेटसारख्या अत्याधुनिक सुविधेमुळे पत्रकारिता बरीच सोपी झाल्यासारखी वाटत असली, तरी कसोटी मात्र तीच आहे. आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी महिलांना या क्षेत्रात मोठी संधी आहे. प्रेस क्लबच्या माध्यमातून महिला दिनी पत्रकारिता क्षेत्रातील महिलांचा दरवर्षी केला जाणारा सत्काराचा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे मुनोत म्हणाल्या. 
बातम्या आणखी आहेत...