आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whole Rajegoan In Trouble, Within One Day Village Defame

राजकीय सूडचक्रात संपूर्ण राजेगाव वेठीस, एका रात्रीत या गावाचे नाव झाले राज्यभरात बदनाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे फाटा - एकमेकांच्या मदतीसाठी सरसावणारे हातच एकमेकांच्याच जिवावर उठले. अवघी ९४१ लाेकसंख्या असलेल्या राजेगावातील घटनेने विकाेपाची परिसीमा गाठली. एका रात्रीत या गावाचे नाव राज्यभरात बदनाम झाले. ग्रामपंचायतीच्या पारंपरिक राजकीय सूडचक्रात संपूर्ण गावालाच वेठीस धरले गेले.

२९ मार्च रोजी साेनई पाेलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून परस्परविराेधी तक्रारी दाखल झाल्या. महारुद्र आव्हाड याने दाखल केलेल्या फिर्यादीत मागील राजकीय भांडणाच्या कारणातून विराेधी गटाने मारहाण केल्याचे म्हटले. त्यानुसार २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुस-या फिर्यादीत सरपंच लता घुले यांनी तू सरपंचपदास लायक नाही, राजीनामा दे, असे म्हणून मुलास पुतण्यास विराेधी गटाने मारहाण केली, असे नमूद केले. यावरून पाेलिसांनी दहा जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर ३० मार्चला राजेगावातील महिलेने सामूहिक बलात्कारप्रकरणी फिर्याद दिली. पीडित महिलेने, हरिनाम सप्ताहाच्या वर्गणीचा हिशेब का मागितला यावरून गावातील चौघांनी अत्याचार केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले.

सरपंच लता यांचे पती लक्ष्मण घुले माजी सरपंच बबन आव्हाड यांच्यात राजकीय वैर आहे. या गावातील शे-दीडशे जण पाेटपाण्यासाठी मुंबईला स्थायिक झालेले. गुण्यागाेविंदाने राहत आलेल्या या गावाला ग्रामपंचायतीच्या राजकारणाची दृष्ट लागली. २५ वर्षांपासून सुरू असलेल्या या राजकीय संघर्षाने मार्चअखेर क्रौर्याची परिसीमा गाठली. या गावात मतदार अवघे सातशेच्या आसपास, तर ग्रामपंचायत सदस्य संख्या सात. वंजारी समाजाची संख्या ७५ टक्के, दाेनच घरे मागासवर्गीयांची. उर्वरित मराठा समाज. वंजारी समाजातील ग्रामपंचायतीवरील वर्चस्वाचा संघर्ष टाेकाला गेला. १७ वर्षांनंतर गावात धार्मिक उत्सवाचा याेग आला. या साेहळ्यामुळे राजेगावचे काैतुक सुरू असतानाच मारामारी अत्याचाराच्या घटनेने या गावाचे नाव राज्यभर चर्चेत आले.

घटनेनंतर गावातील कर्ते पुरुष परागंदा झाले आहेत. राजकारणात नसणारेही झळ साेसत आहेत. मुले एेन परीक्षेच्या काळातच भेदरली आहेत. गावात शुकशुकाट असून काेणीच काही बाेलायला आणि सांगायला पुढे येत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गेल्या २०-२५ वर्षांपासून दाेन गटांत धुसफूस आहे. गेल्या वर्षभरात चार वेळा मारामा-या झाल्या. त्यापूर्वीही तुंबळ मारामारीच्या घटना घडलेल्या आहेत. गावात ग्रामपंचायत निवडणुकीपासून पडलेले दाेन्ही गट परंपरेनुसार आजही कार्यरत आहेत. आजी-माजी सरपंचाच्या गटांतून विस्तव जात नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायतीत एका गटाला पाच, तर दुस-या गटाला दाेन जागा मिळाल्या. धार्मिक साेहळ्यात वरवर दाेन्ही गट एकत्र हाेते; पण आतून मात्र शीतयुद्धाची ठिणगी पडलेलीच हाेती. त्याचा भडका अखेर उडाला. पण ताे वणव्यासारखा पूर्ण गावालाच झळ पाेहोचवणारा ठरू पाहत आहे. धार्मिक कार्याचे श्रेय त्यापूर्वीचे अल्पवयीन मुलीचा विवाह यामुळेही आगीत तेल आेतले गेले. याची परिणिती दिवसांपूर्वीच्या प्रकारात झाली. विधानसभा विधान परिषदेतही याचे पडसाद उमटले.

राजेगावातील मुख्य रस्ते असे निर्मनुष्य झालेले आहेत.

आरोपी एकमेकांचे नातेवाईक
दाेन्हीहीगटांतील आराेपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. सरपंच, माजी सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पाेलिस पाटील, पाेलिस कर्मचारी यांच्यासह ३५ जणांचा आराेपींमध्ये समावेश आहे. पाेलिसांच्या धरपकड सत्राने शेतीची कामे खाेळंबली. शिवाय दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे.

आराेपींत पाेलिसाचाही समावेश
नेवासेसाेनई अशी दाेन स्वतंत्र पाेलिस ठाणी आहेत. राजेगाव हे साेनई पाेलिस ठाणे हद्दीत येते. साेनई ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पाेलिसाचाही आराेपींत समावेश आहे. त्याचे मूळ गाव राजेगाव आहे.

तंटामुक्ती अध्यक्ष अटकेत, पाेलिस पाटील पसार
आजीमाजी सरपंचासह गावातील तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष पाेलिस पाटीलही भांडणाच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. समिती अध्यक्ष अटकेत आहे, तर पाेलिस पाटील फरार आहेत. गावगाडा हाकणा-यांवर दंगली, मारामारी बलात्काराचे गुन्हे दाखल असून बलात्कार प्रकरणातील एक आराेपी अटकेत आहे.