आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Whole Revenue Department Will Go Online Revenue Minister Thorat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महसूल विभाग पूर्णत: होणार ऑनलाइन, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - सुवर्णजयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले असून आता महसूल विभाग पूर्णत: ऑनलाइन करण्याबरोबरच किचकट असलेली जमिनीची बिनशेती प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

भारतभर विस्तार असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या संगमनेर शाखेचे उद्घाटन मंत्री थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी (9 ऑगस्ट) रात्री झाले त्या वेळी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष अनंत राजेगावकर, नगराध्यक्ष दिलीप पुंड, उद्योजक राजेश मालपाणी, मॉडर्न डेअरी फार्मचे प्रवर्तक मेघराज पाटील, आशिष मालपाणी, संगमनेर शाखेचे अध्यक्ष बी. आर. चकोर, मनीष मालपाणी आदी या वेळी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, नाशिक, पुणे व मुंबई या तीन मोठय़ा शहरांच्या सुवर्ण त्रिकोणावर असलेल्या संगमनेर तालुक्याने सर्व क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली आहे. तालुक्यात अनेक मोठी कामे बांधकामे मार्गी लागली. येथील बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम केले असून आता या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संगमनेरच्या विकासात योगदान देण्याची गरज आहे. बांधकाम क्षेत्रात येथील नागरिकांना गुणवत्तापूर्ण सुविधा त्यांनी द्याव्यात. बांधकाम व्यवसायाला केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही मोठय़ा संधी आहेत.

संघटनेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक सभासदांची नोंदणी संगमनेरमध्ये झाली आहे. क्रेडाई संघटनेच्या माध्यमातून येथील बांधकाम व्यावसायिक एकत्र आले. नगराध्यक्ष पुंड, राजेश मालपाणी, मेघराज पाटील, आशिष मालपाणी यांचीही या वेळी भाषणे झाली. अमित पवार, नवनाथ अरगडे, सीताराम राऊत, अरविंद वैद्य, संतोष करवा, सचिव विलास कवडे आदी या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कानवडे, शैलेंद्र गाडेकर यांनी केले, तर रामहरी कातोरे यांनी आभार मानले.

संगमनेर प्लॅन्ड सिटी होईल
महसूलमंत्री थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा विकास झाला. विकासाची ही प्रक्रिया कायम सुरू राहतानाच हे शहर सुंदर प्लॅन्ड सिटी म्हणून नावारूपास येईल. मोठी बाजारपेठ लाभलेल्या या शहरात अनेक देशी-विदेशी बँका कार्यरत झाल्या. आर्थिक विकासाबरोबर आता वैचारिक व सांस्कृतिक शहराची ऐतिहासिक ओळख तयार होईल.’’ रणजितसिंह देशमुख, मॉडर्न डेअरी प्रवर्तक.

नागरिकांचा त्रास कमी
राज्याच्या नकाशावर विविध कामांच्या माध्यमातून संगमनेर उठून दिसत आहे. दुधाची राजधानी बनलेल्या संगमनेरने थोरात यांच्या नेतृत्वाखाली महसूल खात्यालाही नवा चेहरा दिला. लोकाभिमुख ऐतिहासिक निर्णयामुळे नागरिकांचा त्रास कमी झाला. क्रेडाई संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी येथे बांधकाम व्यवसायातून राष्ट्रीय काम केले आहे. ’’ अनंत राजेगावकर, अध्यक्ष, क्रेडाई संघटना.