आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाड्यांना सिरप कोणाच्या सल्ल्याने...?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हास्तरीय अधिकां-यांना विश्वासात घेता राज्यस्तरावरून परस्पर अंगणवाड्यां मधील बालकांना चिक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात भेसळ झाल्याचे उघड झाले. बालकांसाठी विविध प्रकारचे टॉनिक (सिरप) देण्याचाही निर्णय घेण्यात आला, पण आरोग्य विभागाची मदत घेता परस्पर अंगणवाड्यांमधून ते वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे औषधाचा दर्जा अथवा त्याचे गुणधर्म याबाबतही महिला बालकल्याण विभागाचे स्थानिक अधिकारी अनभिज्ञ आहेत.
शासनाकडून बालकांच्या आरोग्यासाठी विध कल्याणकारी निर्णय घेतले जातात. हे निर्णय घेत असताना जिल्हास्तरीय अंमलबजावणी यंत्रणेला विचारात घेतले जात नाही. स्थानिक पातळीवर जनतेचा प्रतिसाद इतर बाबी स्थानिक अधिकांकडून समजू शकतात. पण शासनाकडून राज्यस्तरावरच खरेदी केली जाते.

अंगणवाड्यांसाठी खरेदी केलेले साहित्य थेट प्रकल्पस्तरावर पाठवले जाते. जिल्हास्तरावर झालेल्या पुरवठ्याचा नियंत्रक अधिकारी असलेले जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनभिज्ञ असतात. त्यानंतर प्रकल्प स्तरावरून अहवाल आल्यानंतरच उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाला त्याची माहिती मिळते. अथवा आढावा घेतल्यानंतरच सद्यस्थिती समजू शकते.
अंगणवाडीतील बालकांसाठी राज्यस्तरावरून चिक्कीचा पुरवठा करण्यात आला, पण त्यात रेती आढळून आल्याने राज्यभरात खळबळ उडाली. या विभागाने २०१४-२०१५ या कालावधीत शासनस्तरावरून जिल्ह्यासाठी विध साहित्य उपलब्ध केले. त्यात प्रामुख्याने अमिनो असिड सिरप, ल्ह सिरप, फ्रुटीन सिरप आदी प्रकारचे आरोग्यवर्धक सिरप उपलब्ध करून देण्यात आले. याचे वाटपही झाल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे म्हणणे आहे. पण या आरोग्यवर्धक औषधाचे वाटप करताना आरोग्य विभागाची मदत घेतली नाही.
शासनाने नेमलेल्या पुरवठादारा मार्फत थेट प्रकल्प स्तरावर हे सिरप पोहोच झाले. त्यानंतर प्रकल्पस्तरा वरून अंगणवाड्यांनाही वाटप करण्यात आले. त्यानंतर अंगणवाड्यां मार्फत बालकांना या बाटल्या देण्यात आल्या. पण ते किती प्रमाणात घ्यावे, त्याचे फायदे, धोके याबाबतची माहिती आरोग्य विभागातील तज्ज्ञच देऊ शकतील. सर्रास वाटप करून बालकांच्या आरोग्याशी खेळ केल्याची भावना व्यक्त होत आहे. असे करणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे बालकल्याण विभागाचा गलथान कारभार आणखी चव्हाट्यावर आला आहे.

तपासणीशाय टॉनिक नकोच
बालकांची आरोग्य तपासणी केल्याशाय त्याला कोणतेही टॉनिक देऊ नये. अनेक रुग्ण अंगणवाड्यांतून वाटप झालेले सिरप दाखवण्यासाठी घेऊन येतात. ते आयुर्वेदिक असल्याने त्याचे साईडइफेक्ट होत नाहीत. पण सर्रास सर्वच बालकांना देणे योग्य नाही. आयुर्वेदिक असल्याने त्याचे साईड इफेक्ट नसले, तरी ते किती परिणाम कारक आहे, हे सांगता येणार नाही.'' डॉ.दीपक अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ.

...हा तर आरोग्याशी खेळ
औषधकोणतेही असो, त्याचे वाटप आरोग्य विभागाची मदत घेऊन करायला हवे. स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका ही औषधशास्त्रातील तज्ज्ञ नसते. अशा परिस्थितीत औषधाची मात्रा किती असावी याची माहिती देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी गरजेचे आहेत. पण औषधे थेट वाटप झाले असतील, तर आरोग्याशी खेळ आहे.

सिरप मिळालेच नाही
नगरशहरात बालिकाश्रम भागात रहात असून माझी मुलगी अंगणवाडीत आहे. पण २०१४-२०१५ या वर्षात आम्हाला कोणत्याही प्रकारचे सिरप देण्यात आले नाही. तसेच त्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.'' सावित्रीशिंदे, पालक.
बातम्या आणखी आहेत...