आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Remove Son ? Pachpute Asked Question To Nagwade

मुलाला पदावरून का काढले? माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा शिवाजीराव नागवडेंना सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - आपला मुलगा एवढा कर्तृत्ववान आहे, तर त्यास यापूर्वी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावरून शिवाजीराव नागवडेंनी का काढले याचे उत्तर द्यावे, असा सवाल माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.

पाचपुते म्हणाले, 'नागवडेंना मुलाच्या (राजेंद्र नागवडे) हाती कारभार द्यायचा आहे. मग मागील वेळेस त्यांना अध्यक्षपदावरून दूर का केले होते? मुलगा एवढा कर्तबगार असेल तर यापूर्वीच्या संचालक मंडळात पॅनलमध्येसुद्घा त्यास उमेदवारी का दिली नव्हती? श्रीगोंदे साखर कारखाना या नावामागे अस्मिता दडली असताना श्रीगोंदे नाव बदलून स्वतःचे नाव देणे हा व्यभिचार आहे. ज्ञानदीप शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकांची नार्को चाचणी केली तर त्यातून आर्थिक गैरव्यवहार बाहेर पडतील. कर्मचा-यांकडून पैसे घेण्याची प्रथा नागवडेंना मान्य आहे का? आपण आजवर विरोधकांचे अनेक आरोप सहन केलेत. आता मात्र मुळीच आरोप सहन करणार नसल्याचे सांगत पाचपुते म्हणाले, "नागवडेंनी आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. डिस्टिलरी प्रकल्प दोन वर्षांपासून बंद असल्याने कारखान्याचा तीन कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तेरा वर्षे वीज प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. सभासदांच्या ज्या ३५ कोटींच्या ठेवी आहेत त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. दोन रुपये किलोप्रमाणे साखरेचे वितरण सभासदांना मी सुरू केले होते. ते बंद करून नागवडेंनी काय साध्य केले? मी लावलेली झाडे तोडली, बगिचा नष्ट केला. गेस्ट हाऊस कारखान्याचे गेट माझ्या काळात झाले. अनेक वर्षांपासून कारखान्याला खातेप्रमुखपद नाही. कारखान्याच्या ताब्यातील लिंपणगाव गेट ते कारखाना हा रस्तादेखील त्यांना दुरुस्त करता आला नाही. नागवडेंनी आता खरे बोलावे, आमच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे पाचपुते म्हणाले.

आणखी किती वर्षे सत्ता हवी?
मी३५ वर्षे आमदार होतो तेव्हा नागवडे आणि मंडळी आमदार बदला म्हणून धोशा लावत होती. आता मी आमदार नाही, मात्र नागवडे ४१ वर्षे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आणखी किती वर्षे त्यांना सत्ता हवी अन् कशासाठी हवीय? खूप दिवस पदावर राहिलात. आता तरी खुर्ची खाली करा, असेही पाचपुते म्हणाले.