आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव पेन्शन महागाई भत्त्यासाठी विडी कामगारांचे धरणे, आयटक आणि इंटकच्‍या वतीने निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भगतसिंह कोशियरी समितीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने पेन्शनर विडी कामगारांना दरमहा तीन हजार रुपये द्यावेत महागाई भत्ता लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लाल बावटा विडी कामगार युनियन (आयटक) नगर विडी कामगार (इंटक) संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विडी कामगार महिलांनी जोरदार निदर्शने केली. 

आंदोलनात कारभारी उगले, शंकर न्यालपेल्ली, शंकरराव मंगलारप, अॅड. सुधीर टोकेकर, बुचम्मा श्रीमल, कमलाबाई दोंता, लीलाबाई रासकोंडा, लक्ष्मी कोटा, कमल गेंट्याल, सरोजिनी दिकोंडा, शामला म्याकल, चंद्रकांत मुनगेल, संगीता कोंडा, निर्मला न्यालपेल्ली, कविता मच्चा आदींसह पेन्शनर विडी कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 
 
नोव्हेंबर १९९५ पासून विडी कामगारांना २५० ते ७५० रुपये पेन्शन मिळत होती. सर्व कामगारांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने सप्टेंबर २०१४ पासून दरमहा किमान हजार रुपये पेन्शन सुरू केली. सध्या पेन्शनर विडी कामगारांना दरमहा हजार रुपये पेन्शन मिळत आहे. दिवसाकाठी ही सरासरी ३३.३० रुपये एवढी होते. एवढ्या कमी रकमेत महागाईच्या काळात जीवन जगणे अशक्य झाले आहे. देशातील पंधरा राज्यांमध्ये लाख, तर महाराष्ट्रात ५० हजार पेन्शनर विडी कामगार आहेत. यामध्ये ९० टक्के महिलांचा समावेश आहे. हे सर्व विडी कामगार बीसी, ओबीसी, स्पेशल बीसी अल्पसंख्याक समाजातील असून, ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. सेवानिवृत्त विडी कामगारांची उपजीविका पेन्शनवर अवलंबून असून, त्यांना केंद्र राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक सवलत मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
 
सेवानिवृत्त विडी कामगारांचे आर्थिक सामाजिक परिस्थितीचा सरकारने विचार करण्याची गरज आहे. ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून पेन्शनर विडी कामगारांना महात्मा गांधी आधार योजना म्हणून दरमहा हजार रुपये देण्याचे जाहीर करावे. भगतसिंह कोशियरी समितीच्या शिफारशींप्रमाणे केंद्र सरकारने पेन्शनर कामगार इतर धंद्यांतील कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन त्वरित सुरू करावी, तसेच महागाई भत्ता देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार एम. एस. आंधळे यांना देण्यात आले. 

शिर्डी येथे १३ ऑगस्ट रोजी पेन्शनर कामगारांचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे
उद्घाटन केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्ते होणार असून, त्यांच्याकडेही मागणी केली जाणार आहे. पेन्शनसंदर्भात ते काय घोषणा करतील याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे. 

पेन्शनर विडी कामगारांना महागाई भत्ता लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...