आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करणा-या रूपेश चौधरीला जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पत्नीचा खून करणा-यास जन्मठेपेची शिक्षा झाली. रूपेश राधाकिसन चौधरी (२५, कनकापूर, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी ही शिक्षा सुनावली.
रूपेशचा विवाह जयश्री हिच्याशी झाला होता. तो कायम तिच्या वर्तवणुकीविषयी संशय घेत असे. ७ एप्रिल २०११ रोजी त्याने राहुरीतील आंबी चारीजवळ तिला फोन करून बोलावून घेतले. जयश्री तेथे आल्यानंतर रूपेशने तिला चाकूने भोसकून तिचा खून केला. जयश्रीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी रूपेशविरुद्ध गुन्हा नोंदवला. नंतर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. गोरख मुसळे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने रूपेशला दोषी ठरवले. सरकार पक्षाच्या वतीने रूपेशला आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सत्र न्यायाधीश कुलकर्णी यांनी रूपेशला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.