आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दत्तात्रेय अर्जुन भोसले (वय ३४, जातेगाव, ता. जामखेड) असे आरोपीचे नाव आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी बुधवारी हा निकाल सुनावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता केदार केसकर यांनी काम पाहिले. 

आरोपी दत्तात्रय भोसले हा जानेवारी २०१५ रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घरात त्याच्या मुलाला पट्ट्याने मारहाण करत होता. मुलाला मारु नका, असे म्हणत दत्तात्रयची पत्नी सुवर्णा मध्ये पडली. तिचा राग आल्यामुळे दत्तात्रयने घरातील रॉकेल सुवर्णाच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले. सुवर्णाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा दिर प्रल्हाद भोसले धावत आला. त्यांनी सुवर्णाला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. तेथे तिचे निधन झाले. दत्तात्रयविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात खटला दाखल केला. या गुन्ह्यात अटक झाल्यापासून दत्तात्रय तुरुंगातच होता. 
 
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. सुवर्णाचा मृत्यूपूर्व जबाब, मुलगा आदित्य मुलगी दिव्या यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने दत्तात्रयला दोषी ठरवत जन्मठेप हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 
 
बातम्या आणखी आहेत...