आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wildlife Thirsty Completing Through Rain Water Harvesting

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे भागणार वन्यजीवांची तहान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळ व टंचाईमुळे माणसांची, तसेच वन्यप्राण्यांची होणारी होरपळ जिल्ह्यातील जनतेने अतिशय तीव्रतेने अनुभवली. तिच्यावर उपाय म्हणून कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्याच्या अधिकार्‍यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवला आहे. त्याद्वारे वन्यजीवांची तहान कायमस्वरूपी भागणार आहे. असा यशस्वी प्रयोग राबवणारे ‘रेहकुरी’चे कार्यालय जिल्ह्यातील पहिले सरकारी कार्यालय ठरले आहे.

अभयारण्याचे कार्यालय व वनक्षेत्रपालांच्या घराच्या छतावरचे पाणी एकत्र करून ते साठवण्यासाठी 1 लाख 30 हजार लिटरची टाकी बांधण्यात आली आहे. पहिल्या दोन पावसातच या टाकीत सुमारे अडीच फूट पाणी साठले आहे.

‘छतावरील पाणी साठवा,’ असा संदेश सरकार अनेक वर्षांपासून देत आहे. पण त्याकडे फार कमी लोकांनी गांभीर्याने पाहिले आहे. चांगल्या उपक्रमांच्या बाबतीत ‘लोकासांगे ब्रह्मज्ञान..’ असा सर्वसाधारण बाणा असतो. रेहकुरी अभयारण्यातील वनाधिकार्‍यांनी मात्र काहीही न बोलता पर्यावरणाच्या संवर्धनाच्या मार्गावर आपली वाटचाल दमदारपणे सुरू केली आहे. सहायक वनसंरक्षक राजेंद्र नाले यांनी पाण्यासाठी वणवण करणार्‍या काळविट व अन्य वन्यजीवांची होरपळ अनुभवली. अभयारण्याच्या क्षेत्रात पाण्याचा काहीही स्रोत नव्हता.

वेळप्रसंगी त्यांनी रेहकुरीत नवीन कृत्रिम पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे पाणी पुरवले. ऐन उन्हाळ्यात घेतलेल्या कूपनलिकेलाही चांगले पाणी लागले. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ तात्पुरती थांबवण्यात व्यवस्थापनाला यश आले. पण याबाबत कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी नाले व वनक्षेत्रपाल शांताराम कुंभकर्ण यांनी रेहकुरी अभयारण्याचे कार्यालय, तसेच शेजारीच असलेले वनक्षेत्रपालांचे निवासस्थान यांच्या छतावरील पावसाचे पाणी साठवण्याचे ठरवले. त्यासाठी दोन्ही ठिकाणच्या छतांवरील पाणी एकत्र करून ते पाणी साठवण्यासाठी त्यांनी मधोमध 1 लाख 30 हजार लिटर क्षमतेची टाकी बांधली. त्या टाकीच्या छताच्या पत्र्यांवरील पाणीही वाया जाऊ नये म्हणून पन्हाळ्यांमार्फत एकत्र करून ते टाकीत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही कामे दज्रेदार होण्यासाठी वनक्षेत्रपाल कुंभकर्ण यांनी कोणतीही कसर राहू दिली नाही.


उन्हाळ्यातील पाण्याची गरज पूर्ण होणार
आम्ही आमच्या गरजेनुसार हा प्रयोग केला आहे. या भागात पडणार्‍या पावसाचे सरासरी प्रमाण पाहून ही टाकी निश्चित भरेल, असा मला विश्वास आहे. अभयारण्याच्या व्यवस्थापनाकडे पाच हजार लिटर क्षमतेची पाणी वाहून नेणारी टाकी आहे. मोठी साठवण टाकी भरल्यावर छोट्या टाकीच्या किमान 25 खेपा होणार आहेत. म्हणजे उन्हाळ्याचे चार महिने पुरेल इतका पाणीसाठा फक्त छतावरील पाणी साठवण्याने होणार आहे. त्यामुळे वन्यजीवांची तहान कायमस्वरूपी भागणार आहे.’’ राजेंद्र नाले, सहायक वनसंरक्षक, पुणे वन्यजीव विभाग.