आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगड महासंमेलनातून दबावगट निर्माण करणार : नंदू माधव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "सांगड'चेहे शेवटचे महासंमेलन आहे. सरकारवर दबावगट निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती संयोजक नंदू माधव यांनी गुरूवारी दिली. हे संमेलन १५ ते १८ ऑगस्टदरम्यान स्नेहालयाच्या एमआयडीसी प्रकल्पात होणार आहे.
पर्यावरण, अर्थशास्त्र, मानवी हक्क, जात-धर्म, राजकारण अशा विविध विषयांवर वेगवेगळ्या अंगांनी चर्चा करुन महाराष्ट्रातील एकंदर स्थिती समजावून घेऊन त्यासंबंधीची पुढील योजना आखण्यासाठी हे आठवे संमेलन होत आहे. शांतताप्रिय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन ऑगस्ट २०११ मध्ये मुंबईत पहिले संमेलन झाले. नंतर जळगाव, चिपळूण, पुणे, मिरज, लातूर हेमलकसा येथे महासंमेलने झाली. नगरला होणाऱ्या संमेलनास रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते अंशु गुप्ता, पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, समाजसेविका नीलिमा मिश्रा, तिस्टा सेटलवाड, पुष्पा भावे, धनाजी गुरव, अॅड. असीम सरोदे, शंभू पाटील, संदीप मेहता, श्याम दंडवते, प्रतिभा शिंदे, उल्का महाजन आदी सहभागी होणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...