आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर कार्यालयात बसू देणार नाही - आमदार शिवाजी कर्डिले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-प्रशासनाचे पाण्यासंदर्भात कुठलेही नियोजन नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर मुळा धरणातील फुटव्हॉल्व्ह पातळी खाली सरकवण्यात येईल. आठ दिवसांत वांबोरी चारीला पाणी सोडले नाही, तर अधिकार्‍यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुधवारी दिला.
वांबोरी चारीला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महायुतीतर्फे नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुळा पाटबंधारे विभागाचे अभियंता आनंदराव वडार यांनी आठ दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, नारायण आव्हाड, बाजीराव गवारे, तुकाराम वाघुले, अप्पासाहेब कुलट, शरद दळवी, सुभाष गायकवाड, शरद झोडगे, बाळासाहेब मेटे, अंबादास बेरड, रेवण चोभे आदी सहभागी झाले होते.
आमदार कर्डिले म्हणाले, आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येतो आणि तुम्ही जनतेला सरकारवर दबाव टाकून स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी जनतेला वेठीस धरता. प्रशासनाच्या चुकीमुळे शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. वांबोरी ते पाथर्डी हा कायम पर्जन्य छायेचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. या पट्टय़ातील जनतेसाठी हक्काची पाणी योजना व्हावी यासाठी अनेक आंदोलने झाली होती. त्यानंतर वांबोरी चारी मंजूर होऊन अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर पूर्ण झाली. या चारीच्या माध्यमातून पाझर तलाव भरले जातात. या चारीचा 101 पाझर तलावांना लाभ मिळतो.
मात्र, अजूनही शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येतात. या चारीला पाणी सोडावे या मागणीसाठी महायुतीतर्फे पांढरीपूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर सुरू असलेल्या या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनामुळे वाहनचालकांसह प्रवासी ताटकळले.
आठ दिवसांत पाणी..
वांबोरी चारीच्या पाण्यासाठी महायुतीने आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर मुळा पाटबंधारे विभागाचे अभियंता वडार यांनी आंदोलकांना आठ दिवसांत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन स्थगित केले. मात्र, आठ दिवसांत पाणी न सुटल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
.तर ‘त्या’ पुढार्‍याच्या घरावर मोर्चा नेणार
राज्यातील आघाडी सरकारने चारीच्या पाण्याचे नियोजन न केल्याने शेतकर्‍यांचे हाल होत आहेत. पुढार्‍यांना शेतकर्‍यांचे प्रश्न माहीत नाहीत. अधिकार्‍यांना व मेहुण्याला हाताशी धरून शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळण्याचे काम हे पुढारी करीत आहेत. सत्तेचा गैरवापर करून जनतेची पिळवणूक करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. तुम्ही एवढेच कर्तबगार होते, तर दहा वर्षे हा प्रश्न आठवला नाही का? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला वेठीस धरण्याचे काम करू नका,