आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाज आरक्षण आंदोलन तीव्र करणार- डांगे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनगर महासंघाच्या बैठकीत बोलताना ज्येष्ठ नेते अण्णा डांगे. - Divya Marathi
धनगर महासंघाच्या बैठकीत बोलताना ज्येष्ठ नेते अण्णा डांगे.
नगर- गेल्यादोन वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू केलेल्या धनगर समाज आरक्षण आंदोलनामुळे राज्यात सत्ताबदल झाला. मात्र, सत्तांतर होऊन तब्बल आठ महिने उलटूनही धनगर समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाची व्यापकता वाढवण्यात येणार आहे, असे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णा डांगे यांनी रविवारी सांगितले.
धनगर महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक माउली सांस्कृतिक भवन येथे झाली. या वेळी डांगे बोलत होते. महासंघाचे संस्थापक असलेल्या डांगे यांनी यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार रामहरी रूपनर यांची निवड जाहीर केली. माजी मंत्री पोपटराव गावडे, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, अलका गोंडे, पुष्पा गुरवाडे, शिवाजी राऊत, सुभाष देशमुख, पांडुरंग काकडे, दादाभाऊ चितळकर, शाळिग्राम होडगर, विठ्ठल दातीर, सुदाम तागड आदी या वेळी उपस्थित होते.

डांगे म्हणाले, धनगर महासंघ ही १९९२ मध्ये नोंदणीकृत झालेली धनगर समाजाची एकमेव संघटना आहे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत महासंघाची शाखा कार्यरत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबरोबरच शिक्षण, उद्योग, विवाह या सर्व प्रश्नांबाबत महासंघाच्या वतीने वार्षिक सभा, बैठकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर तब्बल आठ महिने उलटूनही आरक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे डांगे म्हणाले.

धनगर महासंघाच्या बैठकीत बोलताना ज्येष्ठ नेते अण्णा डांगे.
बातम्या आणखी आहेत...