आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावातील दारूचा अड्डा उद्ध्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारू केली जप्त - Divya Marathi
दारू केली जप्त
अमरावती- अमरावती यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वरुड बग्गाजी येथील बग्गाजी सागर या तलावाच्या मधोमध सुरू असलेला एक गावठी दारूचा अड्डा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. ६) कारवाई करून उद्ध्वस्त केला. या अफलातून कारवाईसाठी पोलिसांनी तब्बल ११ तासांचे प्रयत्न केले होते. या ठिकाणाहून पोलिसांनी लाख हजारांची दारू जप्त केली आहे.
गावठी दारू काढण्यासाठी बग्गाजी सागर या तलावाच्या मधोमध असलेल्या बेटावर अड्डा सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने याच परिसरात असलेल्या चिंचपूर गावातून बोट भाड्याने घेतली. या बोटमधून तब्बल एका तासाच्या प्रवासानंतर पोलिसांचे पथक त्या बेटावर पोहोचले. हे बेट जवळपास १५ ते २० एकर असून, त्यावर सर्वत्र घनदाट झाडी गवतांनी व्यापलेले आहे. त्यामुळे ही भट्टी नेमकी कोणत्या ठिकाणी सुरू आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना एक ते दीड तास खर्ची घालावे लागले. अखेर पोलिसांना गावठी दारूचा गुत्ता दिसला. या ठिकाणी दारू काढण्यासाठी पेटलेल्या भट्ट्या सुरूच होत्या.
पोलिसांनी हा अड्डा उद्ध्वस्त करून ३५ ड्रम जप्त केले. यामध्ये हजार ६०० लीटर मोहा सडवा, तसेच तयार गावठी दारू इतर साहित्य असा एकूण जवळपास लाख हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्यानंतर हे सर्व साहित्य जप्त करून पोलिसांचे पथक परत आले. हा गुत्ता वरुड बग्गाजी येथे राहणाऱ्या दीपक शिवरकर, भालचंद्र पाटणकर आणि वसंता वागदरे यांचा असल्याचे पोलिसांना समजले. त्या आधारे पोलिसांनी मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. मात्र, पोलिस दारू अड्ड्यावर पोहोचण्यापूर्वीच हे तिघेही पसार झाले असल्यामुळे त्यांना अटक झालेली नाही. ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर हिर्डेकर, एपीआय नागेश चतरकर त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिस दारू अड्ड्यावर पोहोचण्यापूर्वीच तिघेही आरोपी झाले पसार
दारू अड्ड्याकडे जाणारी बिकट वाट
११ तासांचे ऑपरेशन बग्गाजी सागर, १५ पोलिसांच्या ताफ्याचा समावेश
दारुचीभट्टी तलावाच्या मधोमध असल्याची माहिती झाली. त्यामुळे सोमवारी पहाटे वाजता तीन अधिकारी १२ कर्मचारी असलेले १५ पोलिसांचे पथक या ऑपरेशनसाठी निघाले. त्यांनी दुपारी वाजता ते यशस्वीपणे पूर्ण केले. तब्बल ११ तास पोलिसांनी या ऑपरेशनसाठी जीवावर उदार होऊन काम केले.

जंगलात शोध
घनदाटझाडी गवतांनी व्यापलेल्या जंगलात शोधली अखेर हातभट्टी.
दारू अड्ड्यावर पोहोचलेला पोलिस ताफा
तलावात बोटीतूून प्रवास करताना पोलिस

बेटावर दारू अड्ड्याचा शोध
पाण्यातून कापले चार किमीचे अंतर, ४५ मिनिटांचा प्रवास
बग्गाजीसागर तलावाच्या मधोमध असलेल्या बेटावरील या दारू अड्ड्यावर पोहोचण्यासाठी पोलिसांना वाहन घेऊन जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे पोलिसांचे पथक चिंचपूर गावात गेले. या गावातून त्यांनी एक बोट भाड्याने घेतली. तलावाच्या काठापासून जवळपास चार किलाेमीटर प्रवास करायचा होता.

जिल्ह्यातील पहिलीच कारवाई
वरुडबग्गाजीजवळ असलेल्या तलावाच्या मधोमध असलेला दारू अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी चक्क पाण्यातून प्रवास करावा लागला. या ठिकाणाहून अमरावती आजूबाजूच्या जिल्ह्यातही पुरवठा होत असल्याची माहिती होती. या कारवाईमुळे हा पुरवठा थांबला जाईल. अशा प्रकारची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. सुधीरहिर्डेकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.
अड्ड्यावर जाताना
दारू केली जप्त
शोध घेताना
चिखल वाट