आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"टीम इंडिया'च्या पाकवरील विजयाचा नगरमध्ये फटाके फोडून जल्लोष...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची नगरकरांना मोठी उत्सुकता होती. सामना पाहण्यासाठी अनेकांनी रविवारी सकाळपासूनच टीव्हीसमोर ठाण मांडले होते. सामना सुरू असताना प्रत्येक बॉल व ओव्हरवर सोशल मीडियात अपडेटस् पडत होते. पाकिस्तानचा पराभव होताच अनेकांनी फटाके फोडून जल्लोष केला.
शहराच्या विविध भागांत सामना संपेपर्यंत शुकशुकाट होता. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने नोकरदार, विद्यार्थी तसेच कामगारांनी या सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला. विश्वचषकात आतापर्यंत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. ही परंपरा कायम राहील का, याची सर्वांनाच उत्सुकता होती. एकमेकांना सोशल मीडियावरून सामन्याचे अपडेटस् कळवले जात होते.
पाकिस्तान संघाच्या विरोधात अनेक गमतीशीर कॉमेंटस् सुरू होते. पाकिस्तानचे फलंदाज जसजसे तंबूत परतत होते, तसा या कॉमेंटसची संख्याही वाढत होती. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. पाकिस्तानचा पराभव होताच शहराच्या विविध भागात फटाक्यांचा एकच आवाज घुमला. काही क्रिकेट चाहत्यांनी तर चक्क मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.