आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within 3 Days Sai Santha Collect 4.10 Crores, Divya Marathi

साईचरणी तीन दिवसांत ४.१० कोटी, निवडणुकीच्या धामधुमीमुळे गर्दी कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे यंदाच्या साईबाबा दसरा उत्सवाला साईभक्तांची अपेक्षित गर्दी जमली नाही. तथापि, साईबाबांच्या झोळीत भक्तांनी भरपूर दान अर्पण करून उच्चांक केला आहे. २ ते ४ ऑक्टोबर या तीन दिवसांत तब्बल ४ कोटी १० लाख ७७ हजार रुपयांचे दान साईचरणी जमा झाले. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ५८ लाखांची वाढ झाली आहे. साईबाबांची ९६ वी जयंती लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली. देश-विदेशातील लाखो साईभक्त शिर्डीला येऊन साईचरणी लीन झाले. गेल्या वर्षी याच तीन दिवसांच्या दानाची रक्कम तीन कोटी ५२ लाख ८४ हजार इतकी होती.

ऑनलाइन देणगीत वाढ
शिर्डीत येऊ न शकलेल्या भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने देणगी दिली. यात यंदा तब्बल ३८ लाखांची वाढ झाली. ऑनलाइन पद्धतीने ४४ लाख २८ हजार रुपये जमा झाले. गतवर्षी हा आकडा ६ लाख ४९ हजार रुपये इतका होता.
हुंडीत २. ३३ कोटी जमा
साईच्या हुंडीत दोन कोटी ३३ लाख जमा झाले आहेत. संस्थानच्या देणगी काउंटरवरही गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाखांची वाढ झाली. मंगळवार, बुधवार व गुरुवार या तीन दिवसातील ही आकडेवारी आहे

३ लाख भक्तांकडून प्रसादाचा लाभ
शिर्डीच्या साई संस्थानच्या प्रसादालयात सुमारे दीड लाख साईभक्तांनी लाभ घेतला. याशिवाय एक लाख ४० हजार भाविकांनी दर्शन रांगेतून मोफत लाडू प्रसाद घेतला आहे.