आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Standing Committee Permission Stop Many Subject Discussion

"स्थायी'विना अडली अनेक विषयांची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या स्थायी समितीची सभा झाल्याने अनेक विषय रखडले आहेत. प्रशासनाने विषयांचे प्रस्ताव तयार करून ते स्थायीकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. परंतु स्थायीचे सभापती गणेश भोसले हे सनी शिंदे खूनप्रकरणात अडकल्याने सभा कधी होणार, याबाबत अनिश्चितता आहे.

सावेडीतील घनकच-याचे खासगीकरणातून संकलन करण्यासाठी सव्वा कोटीची निविदा आली आहे. मात्र, स्थायीच्या मंजुरीविना हा विषय लांबणीवर पडला. कोणत्याही आर्थिक विषयासाठी स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागते. प्रशासनाने या विषयांचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी स्थायीकडे पाठवले आहेत. परंतु स्थायी समितीची सभा झाल्याने हे विषय लांबणीवर पडले आहेत. समितीचे सभापती भोसले यांच्यावर खूनप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सभा कोण बाेलावणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भोसले यांचे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना जामीन मिळाला, तर सभेचा मार्ग मोकळा होईल. परंतु जामीन नाकारला, तर सभा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यास भोसले यांना सभा बोलावता येणार नाही. त्यांच्याऐवजी स्थायीचा एखादा ज्येष्ठ सदस्य सभापतिपदी बसून सभा चालवू शकतो. मात्र, तातडीचा विषय असेल, तरच असे घडू शकते. अन्यथा प्रशासनाला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. सावेडीतील घनकच-याचे खासगीकरणातून संकलन करण्यासाठी सव्वा कोटीची निविदा प्रशासनाने निश्चित करून ती मंजुरीसाठी स्थायीकडे पाठवली आहे.