आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयावरून महिलेसह तिघांना मारहाण, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस येईपर्यंत जमावाने महिलेच्‍या कारचे मोठे नुकसान केले होते. - Divya Marathi
पोलिस येईपर्यंत जमावाने महिलेच्‍या कारचे मोठे नुकसान केले होते.
नगर - मुलांचे अपहरण करत असल्याच्या संशयावरून एका प्रतिष्ठित महिलेला युवकांच्या जमावाने बेदम मारहाण केली. काही प्रत्यक्षदर्शी पोलिसांनी महिला तिच्या कुटुंबाची सुटका केली. मात्र, पोलिस येईपर्यंत महिलेच्या कारची जमावाने प्रचंड तोडफोड करून नुकसान केले. हा प्रकार गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास मुकुंदनगरमधील बॉम्बे हॉस्पिटलसमोर घडला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमाव पांगवला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी नोंदवण्यात आल्या आहेत.
 
मुलांना पळवून नेत असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने महिलेची मारुती रिट्स कार पलटी करून कारच्या काचा फोडल्या. महिलेसह तिघांना जमावाने बेदम चोप दिला. स्थानिक लोकांनी तत्काळ भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळवली. नंतर शहर उपअधीक्षक अक्षय शिंदे, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे एपीआय कैलास देशमाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल राजू वाघ आदींनी प्रसंगावधान राखून महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांच्या वाहनातून कुटुंबाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
 
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात राजू राय माेहंमद खान (३८, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, रिट्स कारमधून आलेली महिला, तिच्यासोबत असलेला पुरुष आणखी एका महिलेने तीन अल्पवयीन मुलांना त्यांच्या कारमध्ये बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या मुलांची किडनी काढण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न होत असताना जमावाने त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह तिघा जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला.
 
दुसरी फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्या मुकुंदनगर परिसरात सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी गेल्या असता दुकान दाखवण्यासाठी त्यांनी काही लहान मुलांना गाडीत बसवले. ते पाहून राजू रायमहंमद खान, सरफराज सय्यद जहागीरदार, साहिल पिरजादे, महंमद सरफराज जहागीरदार, अश्पाक खान, काळ्या शेख, आयाज शेख अनोळखी ४० ते ५० जणांनी (सर्व मुकुंदनगर) मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याचा आरोप करत शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अंगावरील लाख ४० हजार रुपयांचे हिरेजडित दागिने ओरबाडले. त्यांना सोडवायला त्यांची सून मुलगा तेथे आले असता जमावाने त्यांनाही बेदम मारहाण केली. सुनेचाही विनयभंग केला. कारचे मोठे नुकसान केले.
 
महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजू खान इतरांवर दरोडा, विनयभंग, शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने करत आहेत.
 
म्हणून ते वाचले
जमावबेदम मारहाण करत असताना एलसीबीचे हेड कॉन्स्टेबल राजू वाघ, समाजसेवक भाई राजा, नगरसेवक फैयाज केबलवाला, पत्रकार इक्बाल शेख, नासीर खान, अनिस शेख यांनी महिलेसह तिच्या मुलाला सुनेला एका दुकानात बसवले. जमाव संतप्त असल्याने त्यांनाही काही करता येईना. पोलिस कर्मचारी वाघ यांनी जीव धोक्यात घालून कुटुंबाचे संरक्षण केले. काही वेळाने पोलिसांचा फौजफाटा आल्यानंतर या महिलेला कुटुंबाला सुरक्षितरित्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
 
पोलिसांचे संख्याबळ अपुरे
मुकुंदनगरपरिसरात गोंधळ तणाव निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी भिंगार कॅम्पचे अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्यानंतर अर्ध्या तासाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावातील लोकांची संख्या पाचशेहून अधिक होती. त्या तुलनेत पोलिसांचे संख्याबळ अत्यल्प होते. सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, तोफखान्याचे निरीक्षक राकेश मानगावकर सहकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत महिलेच्या कारचे प्रचंड नुकसान झाले होते.
 
बातम्या आणखी आहेत...