आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पो अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - भरधाव टेम्पोची धडक बसल्याने वृद्ध महिला ठार झाली आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. विमल गणपत सुरवसे (65, जामखेड) असे मृत महिलेचे नाव आहे.

जामखेड येथील विमल सुरवसे या शहरातील बसस्थानकासमोरील साई गौरव हॉटेलसमोरून जात होत्या. नगरच्या दिशेने जात असलेल्या टेम्पोची(एमएच 12 एफझेड 9782) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इंडिका कारला (एमएच 13 एझेड 6071) धडक बसून रस्त्यावरून जाणार्‍या सुरवसे यांना चिरडले. पळून जाणार्‍या टेम्पोचालकास नगर रस्त्यावर चिंचपूर शिवारात पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. या टेम्पोचा पाठलाग इंडिकामधील चालक अलीम नजीर सय्यद, शांतीकुमार शाहू चोभे व मनमन महारुद्र मुंढे यांनी करून टेम्पोस पकडून चालक अनिल दादा गाजरे (35, निमगाव भोगी, ता. शिरूर, जि. पुणे) यास पोलिसांच्या ताब्यात दिले.

गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी सलील तांबोळी, असिफ तांबोळी, अजम राऊत, तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी मदत केली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी रुग्णालयात तातडीचे उपचार मिळवून देतानाच जखमी विमल यांना नगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यासाठी मदत केली. परंतु नगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात सुरू असताना पहाटे तीनच्या सुमारास सुरवसे यांचा मृत्यू झाला. वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.