आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हस्केवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.जिजाबाई बबन गोरडे (म्हस्केवाडी) असे महिलेचे नाव आहे. त्याआधी रांधे येथे एका व्यक्तीला, तर म्हस्केवाडी येथे अडीच वर्षांच्या मुलाला बिबट्याने जखमी केले. परिसरात ते बिबटे असल्याने ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण अाहे.

म्हस्केवाडी येथील पिलानी वस्तीवरील जिजाबाई या सोमवारी सायंकाळी शेतात काम करत होत्या. जवळच असलेल्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या जागीच ठार झाल्या. नंतर बिबट्याने त्यांना उसाच्या शेतात ओढून नेले. नंतर सापडलेला जिजाबाईंचा मृतदेह तेथून नेल्यानंतर तेथे काही वेळातच आणखी दोन बिबटे आले. त्यामुळे उपस्थितांची त्रेधा उडाली. रविवारी याच वस्तीवर वैभव गोरडे यांच्या अडीच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेची माहिती वनविभागाला दिली होती, परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
बातम्या आणखी आहेत...