आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताकदिनी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नांदवण्यास नकार देणार्‍या सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी करीत एका महिलेने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या महिलेला रोखले.

रेखा उत्तम फुलमाळी (हल्ली रा. माथनी, ता. नगर) असे या महिलेचे नाव असून हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याची तिची तक्रार आहे. जातपंचायतीने सासरच्या लोकांना रेखाला नांदवण्याचा निकाल दोनदा दिला. मात्र, नांदवण्याऐवजी राज्य राखीव पोलिस दल (दौंड) येथे कॉन्स्टेबल असलेला रेखाचा पती उत्तम गंगाराम फुलमाळी (रुईछत्तिसी) याचे सप्टेंबर 2012 मध्ये दुसरे लग्न करण्यात आले. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रेखाने पोलिसांकडे पाठपुरावा केला. कारवाईस टाळाटाळ करण्यात येत असल्याने ती कुटुंबीयांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली. आत्मदहन करण्याचा इशारा तिने दिला होता. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच तिने अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. कोतवाली पोलिसांनी हस्तक्षेप करून तिला रोखले. आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.