आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर सहायक पोलिस आयुक्तास महिला भररस्त्यामध्ये चोपतील, तृप्ती देसाई यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - महिला पोलीस सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सहायक पोलीस आयुक्त श्याम निपुंगे याला अटक करण्यात कुचराई केली, तर आम्ही महिला त्याला असेल तेथून शोधून काढतील भर रस्त्यात यथेच्छ चोपतील, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष अॅड. तृप्ती देसाई यांनी गुरूवारी येथे बोलताना दिला. 
 
लिंगदेव येथील मूळ रहिवासी असलेल्या ठाणे जिल्ह्यात काॅन्स्टेबल म्हणून नोकरीस असलेल्या सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येस जबाबदार आरोपीला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी अॅड. देसाई यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. आठवडे बाजार असतानाही या मोर्चात लिंगदेवचे ग्रामस्थ, सामाजिक संघटना महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांचे गृहखात्याच्या कारभारावर नियंत्रण राहिले नसल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. महिला लहान मुले, मुली सुरक्षित नाहीत. पोलीसच जबरदस्ती करून महिलांचे शोषण करत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल करून देसाई यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा, अशी मागणी केली. आरोपी असलेला सहायक पोलीस आयुक्त निपुंगे याला दिवसांत अटक झाल्यास महिला ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाला घेराओ घालून कामकाज बंद पाडतील, असा इशाराही त्यांनी दिला. 
 
अॅड. तृप्ती देसाई म्हणाल्या, सुभद्रा पवार कळवा पोलीस ठाण्यात काॅन्स्टेबल होती. तिच्या आत्महत्येस महिना पूर्ण झाला. वरिष्ठ अधिकारी निपुंगे तिच्या नियोजित वराच्या विरोधात आत्महत्येस जबाबदार धरून गुन्हा दाखल झाला आहे. निपुंगे हा आरोपी असूनही त्याला अद्याप अटक झालेली नाही. तो नाशिक येथे राजरोस फिरत असताना पोलीस त्याला अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. गृहमंत्री फडणवीस झोपा काढत आहेत. सुभद्राची आत्महत्या आहे की तिचा खून करण्यात आला आहे, हे तपासून पाहिले पाहिजे. तपास करण्यात पोलिसांवर दडपण येत असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे दिला पाहिजे, अशीही मागणी देसाई यांनी केली.

 
सुभद्रा पवार आत्महत्याप्रकरणी कासवगतीने सुरू असलेल्या तपासाचा सर्वांनी निषेध केला. घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालय पोलीस ठाण्यावर आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक डाॅ. संदीप कडलग यांनी मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली. अॅड. मंगला हांडे यांनी प्रास्तविक केले. यावेळी जि. प. सदस्य डाॅ. किरण लहामटे, सतीश भांगरे, पं. स. उपसभापती मारूती मेंगाळ, नगरसेविका सोनाली नाईकवाडी-धुमाळ, माजी सरपंच सुमन जाधव, उज्ज्वला वाकचौरे, निर्भय चित्रपटाची नायिका अभिनेत्री योगिता दांडेकर, निर्माता आनंद बच्छाव यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत आरोपी निपुंगे यास पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. आरोपींना अटक करण्याचे निवेदन तहसीलदार पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...