आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडाची फांदी अंगावर पडून महिला जखमी, दशक्रिया विधी सुरू असतानाच घडला प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नालेगावयेथील अमरधाममध्ये दशक्रिया विधी सुरू असतानाच अचानक झाडाची मोठी फांदी अंगावर पडल्याने सात महिला जखमी झाल्या. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याचवेळी झाडावरील आग्यामोहोळाच्या मधमाशांनीदेखील महिलांवर हल्ला चढवला. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी आलेल्यांचा एकच गोंधळ उडाला. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालय खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापौर सुरेखा कदम यांनी तत्काळ जखमींची विचारपूस करत वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक बोलावली आहे. 
 
सर्जेपुरा भागातील नगरसेविका जयश्री सोनवणे यांच्या पतीचा दशक्रिया विधी अमरधाममध्ये सुरू होता. या विधीसाठी नातेवाईकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता विधी सुरू असतानाच अचानक एका उंच झाडाची मोठी फांदी तुटून खाली पडली. त्यात महिलांसह दहा-बाराजण जखमी झाले. महिला ज्या बाजूने बसलेल्या हाेत्या, त्याच ठिकाणी ही फांदी पडल्याने महिला अधिक जखमी झाल्या. त्यातच एका झाडावरील आग्यामोहोळाच्या मधमाशांनी उपस्थित नागरिक महिलांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दशक्रिया विधीसाठी उपस्थित आलेल्यांची मोठी धावपळ उडाली. 
 
फांदीचा मार लागल्याने एका महिलेच्या हाताचा रक्तपुरवठा बंद झाला. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिसा गोरख सोनवणे (वय ४५), लक्ष्मी भास्कर काळोखे (वय ४८, दोघी सर्जेपुरा), कुसूमबाई रामदास गायकवाड (वय ७०, वैजापूर, औरंगाबाद), राधाबाई भारत नन्नवरे (वय ४२, नागापूर), शांताबाई श्रीदीप शेळके (वय ४५, श्रीरामपूर), शांताबाई नन्नवरे (सिध्दार्थनगर) या महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती समजताच महापौर सुरेखा कदम यांनी जखमी महिलांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी सभागृह नेते अनिल शिंदे, माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेविका उषा ठाणगे आदी उपस्थित होते. 
 
जखमी झालेल्या महिलांची महापौर सुरेखा कदम यांनी रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. समवेत अन्य नगरसेवक अधिकारी. अमरधाममधील या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर कदम यांनी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची गुरूवारी बैठक बोलावली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा होईल. दरम्यान, महापालिकेचे अधिकारी समितीची बैठक घेत नसल्याची सदस्यांची अनेक दिवसांपासूनची तक्रार आहे. महापालिका प्रशासन या तक्रारींकडेदेखील दुर्लक्ष करत आहे. 
 
वृक्षांसाठी पेस्ट कंट्रोल सुविधा नाही 
शहरात जी थोडीफार झाडे शिल्लक आहेत, त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी झाडांची कोणतीही परवानगी घेता कत्तल करण्यात येते. वृक्ष प्राधिकरण समितीचे संबंधित अधिकारी अशा वेळी केवळ बघ्याची भूमिका घेतात. शहरातील झाडांना पुणे- मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पेस्ट कंट्रोल झाले पाहिजे, तरच त्यांचे संवर्धन होईल, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...