आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना फसवणारा पोलिसांच्या रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- खोटेनाव माहिती सांगून महिलेशी लग्न करायचे. नंतर तिच्याकडील पैसे, दागिने मौल्यवान चीजवस्तू घेऊन पोबारा करायचा. पुन्हा दुसऱ्या महिलेशी लग्न जुळवायचे. प्रत्येक वेळी वेगवेगळे नाव सांगून हा उद्योग करणाऱ्या व्यक्तीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत आहे. आतापर्यंत त्याने अनेक महिलांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणी नेवासे खुर्द येथील एका महिलेने नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अविनाश शंकर पाटील (नेवासे) ऊर्फ संजय शंकर सगळे / सांगळे (दोडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आला. नेवासे येथील महिलेशी लग्न केल्यानंतर किमती वस्तू, पैसे घेऊन त्याने पोबारा केला. ही घटना नोव्हेंबर २००९ ते १३ जानेवारी २०१४ या कालावधीत घडली. इतके दिवस तो महिलेचा पती म्हणून वावरत होता.
फिर्यादी महिला वकील असून तिने नेवासे पोलिस ठाण्यात २० जानेवारी २०१४ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणूक, चाेरीसह इतर कायदा कलमान्वये केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास नेवासे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करत आहेत.

आरोपी अविनाश पाटील हा संजय शंकर सगळे, संजय शंकर सांगळे, संजय शंकर पाटील, अविनाश शंकर पाटील, मनोहर शंकर पाटील, संजय शंकर सगळे पाटील अशी विविध नावे बदलून वावरत असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांना खोटे नाव माहिती सांगून, फसवून तो लग्न करतो. नंतर त्यांच्याकडील पैसे, इतर दागिने, किमती वस्तू घेऊन गायब होतो. त्यामुळे या आरोपीबाबत माहिती मिळाल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिलांना फसवण्याचे प्रकार टाळण्यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...