आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर महिला भाजप सदस्य नोंदणीत सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने स्वतंत्रपणे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. माळीवाडा वेस, बंगाल चौकी, सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक, गंगा उद्यान, एकविरा चौक, निबळक, धरमपुरी या भागात पदाधिकारी जाऊन सदस्य नोंदणी करत आहेत.
अभियानात महिला आघाडीच्या अध्यक्ष गीता गिल्डा, माजी उपमहापौर गीतांजली काळे, कालिंदी केसकर, छाया रजपूत, नीता देवराईकर, हेमलता कांबळे, संगीता मुळे, सुरेखा जंगम, शबाना खान, स्वाती कांबळे, लीला अग्रवाल, चारू पुणतांबेकर, अर्पिता कांबळे आदी पदाधिकारी सहभागी झाल्या आहेत. या वेळी गिल्डा म्हणाल्या, महाराष्ट्रात व देशात भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयांमुळे देशात स्वस्ताई आली आहे. त्यामुळे महिलावर्गातून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सर्व स्तरातील महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.