आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Doctor Rape Attempt Case In Shirdi Sai Baba Sansthan Hospital

शिर्डीत महिला डॉक्टरांचा विनयभंग; चार आरोपींवर गुन्हा; एकाला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत असलेल्या दोन महिला डॉक्टरांचा चार तरुणांनी विनयभंग केल्याची घटना सोमवारी समोर आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य तिघे फरार आहेत.

मंगळवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विरारच्या (मुंबई) या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी असून त्या साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ही घटना रविवारी (दि. १६) आपल्या पालकांना सांगितल्यानंतर सोमवारी दुपारी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपी आकाश कैलास राजपूत (रा. शिर्डी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सूरज शेजवळ, किरण बोरडे, रोहित मगर या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी रात्री हे तरुण रुग्णालयात आले होते. त्यांनी ड्यूटीवर असलेल्या या मुलींना अडवून छेडछाड केली. तसेच त्यांच्या मोबाइल नंबरचीही विचारणा केली. कशीबशी सुटका करत या मुली तातडीच्या उपचार कक्षात पोहोचल्या व तेथे निवासी डॉक्टरांना त्यांनी हा प्रकार सांगितला. त्या डॉक्टरांनी विचारणा केली असता त्या मुलांनी डॉक्टरांनाही धमकावले. या प्रकरणी सोमवारी (दि. १७) तक्रार दाखल होताच साईनाथ रुग्णालयातील स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांच्या माहितीवरून आकाश राजपूत या मुख्य आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याला पीडित महिला डॉक्टरांनी ओळखले असून त्याने अन्य तिघांची नावेही सांगितली आहेत.
इतर डॉक्टरही धास्तावल्या
या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा प्रशिक्षण कालावधी १२ डिसेंबर रोजी पूर्ण होतो. मात्र, या प्रकरणाने धास्तावलेल्या प्रशिक्षणार्थी सर्व १३ मुलींनी तातडीने रुग्णालय सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याला संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राव यांनी दुजोरा दिला आहे. तसेच आम्ही सुरक्षेची काळजी घेऊ पुन्हा असे घडणार नाही व त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही डॉ. राव म्हणाले.