आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरांच्या मारहाणीत महिला जखमी; डोक्यात लोखंडी रॉडने केला वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर-सोलापूर महामार्गावरील दरेवाडी येथील ज्ञानेश्वर बेरड यांच्या घरात घुसून तीन चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. बेरड कुटुंबातील एका महिलेच्या डोक्यात चोरट्यांनी लोखंडी रॉडने वार केला. ही महिला गंभीर जखमी झाली. 


नगर तालुक्यातील दरेवाडीतील ज्ञानेश्वर भाऊसाहेब बेरड यांचे हरिकृष्णनगर येथे िकराणा दुकान आहे. दुकानाच्या मागील बाजूस त्यांचे घर आहे. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. ज्ञानेश्वर बेरड हे नातेवाईकांकडे गेले होते. घरात त्यांची लहान मुले, पत्नी वृध्द आई- वडील होते. चोरट्यांनी घरात प्रवेश करताच कपाट इतर सामानाची उचकापाचक केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. 

 

 

त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या खोलीकडे आपला मोर्चा वळवला. दरवाजा उघडल्याचा आवाज आल्याने ज्ञानेश्वर बेरड यांच्या पत्नीला, दीपाली यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड करू नये, यासाठी चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. त्यात दीपाली या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या आेरडण्याच्या आवाजाने घरातील लहान मुले जागी झाली.

 

त्यांच्या आेरडण्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. जाताना दीपाली यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले, तसेच दीपाली यांची पर्स कपाटातील पंधरा हजार रुपयांची रोकडही पळवली. या घटनेेमुळे दरेवाडी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपाली यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याने ११ टाके पडले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...