आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा विनयभंग;चौघांविरुद्ध गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कायनेटिक चौक परिसरात राहणार्‍या 14 वर्षांच्या शाळकरी मुलीच्या विनयभंगाची घटना रविवारी (26 जानेवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली. या तिघांना न्यायालयाने 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. इम्रान आसिफ बागवान (पंचपीर चावडी), अक्षय अनिल विधाते (पारगल्ली), कपिलेश्वर दीपक गायकवाड (सारसनगर), संतोष सोनवणे (शनी चौक) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा, नागरी हक्क संरक्षण कायदा, बालकांचा लैंगिक अत्याचार कायदा, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सोनवणे वगळता इतरांना अटक करण्यात आली. रविवारी मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून इम्रान तिच्या घरात घुसला. मुलगी ओरडल्याने आरोपींनी तेथून पोबारा केला.