आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांना मिळणार तगडी बाजारपेठ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - बचत गटांच्या उत्पादनांना आता सोन्याचे दिवस येऊ शकतात. या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असून ‘ग्राममार्ट’ ही पथदर्शी योजना येत्या काळात राबवण्यात येणार आहे. या वस्तूंच्या विक्रीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर विक्री केंद्रे सुरू करण्यात येतील. राहुरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. बचत गटांनी यासाठी उत्पादनांचे जोरदार मार्केटिंग करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या वेळी कॉ. गंगाधर जाधव उपस्थित होते. पाटील म्हणाले, ग्रामविकासामध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर असून ग्रामीण विकासातून या भागाचे सक्षमीकरण करणे, राज्यातील दारिद्रय़ निर्मूलन करण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी ‘उमेद’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. जोवर सक्षम माध्यमे निर्माण होत नाहीत तोवर सर्वांगीण विकास अशक्य असल्याचे सांगून माध्यमांमुळेच अहमदाबादचा माणूस थेट दिल्लीत पोहोचला असल्याचे ते म्हणाले.

या वेळी सभापती डॉ. उषा तनपुरे, अध्यक्ष अरुण कडू, डॉ. तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश वाबळे, प्रसिद्ध चित्रकार अनुराधा ठाकूर, निर्मला मालपाणी, प्रमिला कोळसे, नगराध्यक्ष गयाबाई ठोकळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी केले, तर प्राजक्त तनपुरे यांनी आभार मानले.