आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Women Voter Registration,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला मतदार नोंदणीवर भर द्यावा : जिल्हाधिकारी कवडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत 69 हजार महिला मतदारांची संख्या कमी आहे. त्यासाठी महिला मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रित करावे, असे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी दिले. मतदार जागृतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे आदी यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, 1 जानेवारी 2014 रोजी ज्यांची वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करावे.मतदारयादीत 69 हजार महिला कमी आहेत. त्यांची नावे येण्यासाठी गावनिहाय फरक काढून त्यावर लक्ष केंद्रित करावे.
21, 22, 28 व 29 जूनला विशेष मतदार नावनोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या-ज्या शासकीय कार्यालयांशी, तसेच संस्था, महिला बचत गट, स्वस्त धान्य दुकाने, विवाह नोंदणी संस्था, ग्रामीण विकास यंत्रणा, नेहरू विकास यंत्रणा, नेहरू युवा केंद्र, तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये फॉर्म नंबर 6 ठेवावा. हा फॉर्म भरून तहसील कार्यालयात सादर केल्यानंतर संबंधिताचे नाव यादीत समाविष्ट होईल. महाविद्यालयांनी 18 वर्षांवरील युवकांच्या 100 टक्के नावनोंदणीसाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी कवडे यांनी केले.