आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिच्या जिद्दीला सलाम: पंपावर काम करून चालवले कुटुंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगरमधील पंपावर कार्यरत असलेल्या मीना आहुजा. - Divya Marathi
नगरमधील पंपावर कार्यरत असलेल्या मीना आहुजा.
नगर- पतीच्या निधनानंतर आपले स्वप्न मुलांमध्ये पाहणाऱ्या आईची ही कहाणी. ज्या मुलांमध्ये आईने आपले स्वप्न पाहिले, त्या मुलालाही नियतीने आेढून नेले. अशा परिस्थितीतदेखील जगण्याची अाशा सोडलेल्या मीना आहुजा यांनी शहरातील पेट्रोलपंपावर काम करून कुटुंबाचा गाडा हाकला. 

२०१४ मध्ये काविळीच्या आजाराने मीना यांच्या पतीचे निधन झाले. २०१६ मुलाचा अपघातात मृत्यू झाला. पण त्यामुळे खचून जाता पेट्रोलपंपावर नोकरी करत मीना आहुजा यांनी संसार सावरला. मीना यांचे माहेर कोपरगावचे. तीन वर्षांपूर्वी त्यांचे पती मनोज यांना पांढरी कावीळ झाली. रुग्णालयात चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचे निधन झाले. घरात एकटे पतीच कमवणारे होते. एकाएकी आलेल्या या संकटामुळे आपल्या दोन मुलांचे कसे होणार? हा प्रश्न मीना यांच्यासमोर उभा राहिला. संकटांच्या काळात नातेवाईकांनीही साथ सोडून दिली. याही परिस्थिीत मुलांकडे पाहून संसाराचा गाडा पुढे नेण्याचा विचार मीना यांना स्वस्थ बसू देत नव्हता. नोकरी करायची, पण कुठे करायची, कोण नोकरी देणार, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. 

मीना यांच्या पतीचे मित्र झोपडी कँटीनजवळील दीपक पेट्रोलपंपावर काम करत होते. मीना यांना तेथे लगेचच नोकरी मिळाली. दोन मुलांबरोबर संसाराचा गाडा हाकणाऱ्या मीना यांच्या लहान मुलाचा याचदरम्यान अपघात झाला. त्यात त्याचे निधन झाले. पेट्रोलपंपावर काम करत असताना त्यांनी आपले अधुरे राहिलेले स्वप्न मुलांत पाहिले होते. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. नियतीने हा डाव मोडला. अशाही परिस्थितीत जगण्याची उमेद सोडलेल्या मीना यांनी पुन्हा पेट्रोलपंपावर काम सुरू केले. 

मुलाच्या जाण्याने कायमची हुरहुर... 
पेट्रोल पंपावर काम करताना सर्वांनीच मला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली. अडचणीच्या काळात नातेवाईकांनी साथ सोडली. मात्र, तरीदेखील खचता मुलांसाठी पेट्रोलपंपावर काम केले. मुलाच्या अचानक जाण्याने मात्र कायमची हुरहुर लागली.''
- मीना आहुजा. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...