आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला, बालविकासची खरेदी नियमांनुसारच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महिलाबाल विकास विभागातील साहित्यखरेदी नियमानुसारच करण्यात आली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मंत्री पंकजा मुंडे यांनी नियमानुसारच साहित्याची खरेदी केली. केंद्र सरकारचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करावयाचा होता. तो परत जाऊ नये, म्हणून आधीच्या सरकारमधील मंत्र्यांनी ज्या नियमानुसार काम केले, त्याच नियमानुसार मुंडे यांनी काम केले. त्यांच्याकडून कुठल्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही. आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आलेल्या धमकीपत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना देण्यात आले आहेत. हजारे यांच्या सुरक्षेचाही ते आढावा घेतील, असे शिंदे म्हणाले.
माजी मंत्री छगन भुजबळ यांची लाचलुचपत प्रतिबंधक भागाकडून सुरु असलेली चौकशी नियमानुसार सुरु आहे. तपासात तथ्य आढळल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात जाणीवपूर्वक काहीही नाही. ईडीनेदेखील गुन्हे दाखल केले आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. भ्रष्टाचार करणाना मोकळे सोडले जाणार नाही, असे शिंदे म्हणाले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन भागामार्फत शिर्डी शनिशिंगणापूर देवस्थानला शेष निधी देण्यात येणार आहे. सिद्धटेक देवस्थानसाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी काही निधी उपलब्धही झाला आहे. नगर येथील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाबाबत लवकरच व्यापक बैठक घेण्यात येणार आहे, असे शिंदे म्हणाले.
शनी शिंगणापूर, शिर्डीला विशेष निधी
बातम्या आणखी आहेत...