आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 18 व 19 ला, क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या मान्यतेने राणी लक्ष्मीबाई कला, क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशीय प्रतिष्ठान, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क क्रीडा संकुलात १८ व १९ फेब्रुवारीला १७ वी राज्य वरिष्ठ महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती स्पर्धेच्या मुख्य आयोजक अंजली देवकर-वल्लाकटी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत िदली.

राज्य वरिष्ठ महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या स्वागताध्यक्ष उपमहापौर सुवर्णा कोतकर आहेत. राज्याचे क्रीडामंत्री िवनोद तावडे यांच्या हस्ते १८ ला या स्पर्धेचे उद््घाटन होईल. आमदार िशवाजी कर्डिले, अरुण जगताप, खासदार िदलीप गांधी, भीमराव धोंडे, बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब कांबळे, राहुल जगताप, िजल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यावेळी उपस्थित राहणार आहेत. १९ ला होणाऱ्या पारितोषिक िवतरणास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आमदार संग्राम जगताप, िजल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, माजी उपाध्यक्ष शालिनी िवखे, दुर्गा तांबे, शीतल जगताप, सविता िफरोदिया, छाया िफरोदिया आदी उपस्थित असतील. राज्याच्या िवविध भागातील सुमारे ४०० महिला कुस्तीपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ४८, ५३, ५५, ५८, ६०, ६३, ६९ व ७५ या वजनगटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व ऑलिंपिक वीर गीता फोगट असेल. महिलांची कुस्ती घरोघरी पोहोचली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वल्लाकटी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस उपमहापौर सुवर्णा कोतकर, िजल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, शंकरराव घुले, नामदेवराव लंगोटे, नाना डोंगरे, िजतेंद्र वल्लाकटी आदी यावेळी उपस्थित होते.

संकुलासाठी मदत
स्पर्धेचे स्वागताध्यक्षपद िदल्याबद्दल आयोजकांचे आभार मानून उपमहापौर सुवर्णा कोतकर म्हणाल्या, महिला कुस्ती स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होणे गरजेचे आहे. शहरात महिला कुस्ती संकुलासाठी महापालिकेच्या वतीने निश्चितपणे भरीव मदत िदली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना िदले.