आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: पदभार घेताच नवे आयुक्त मंगळे यांना मनपा कामगारांचा घेराव, रोषाला द्यावे लागले तोंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नवे महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांनी अखेर बुधवारी पदभार स्वीकारला. मात्र, पदभार स्वीकारताच मनपा कामगारांनी थकीत पगार इतर मागण्यांसाठी त्यांना घेराव घातला. बोल्हेगाव येथील चोभे कॉलनीतील नागरिकांनीही नागरी सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या दालनात ठिय्या दिला. पहिल्याच दिवशी आंदोलनांना तोंड द्यावे लागल्याने मंगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. 
 
आयुक्त दिलीप गावडे यांच्याजागी मंगळे यांची बदली झाली, परंतु त्यांनी पदभार स्वीकारल्याने गावडे यांना काही दिवस काम पहावे लागले. गावडे यांच्यानंतर काही दिवस जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला. मंगळे बुधवारी रुजू झाले. पदभार घेण्याचा सोपस्कार पूर्ण होताच बोल्हेगावच्या नागरिकांनी त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. बोल्हेगाव रस्त्यापासून चोभे कॉलनीपर्यंतच्या ५०० मीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. पाणीदेखील वेळेत मिळत नाही, सांडपाणी विल्हेवाटीची कोणतीही व्यवस्था नाही. नागरी सुविधा मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट नवीन आयुक्त मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदवला. 
 
यावेळी भारिप बहुजन संघटनेचे सुनील शिंदे, दिलीप साळवे, भाऊसाहेब कोहकडे, सुरेखा पवार, रेखा घाडगे, बाळू कसबे आदी उपस्थित होते. आयुक्त मंगळे यांनी यावेळी आंदोलकांची समजूत काढत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. हे आंदोलन संपल्यानंतर महापालिका कामगार संघटनेने आयुक्त मंगळे यांना घेराव घालण्यात आला. जुलै महिन्याचा थकीत पगार, दहिहंडी सणासाठी अॅडव्हान्स, निवृत्त कामगारांची पेन्शन आदी मागण्यांसाठी कामगारांनी थेट मंगळे यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घातला. सर्व मागण्या तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कामगारांनी आंदाेलन मागे घेतले. संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे आनंद वायकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...