आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"अभय'चा लाभ घेतल्यास दंडासह वसूल करू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महापालिकेच्या वतीने बुधवारी आयोजित स्थानिक संस्था कर अभय योजना २०१५ च्या कार्यशाळेत उपायुक्त अजय चारठाणकर यांना प्रश्न विचारताना व्यापारी.)
नगर - स्थानिक संस्था कर (एलबीटी) थकवणाऱ्या व्यावसायिकांनी शासनाच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा; अन्यथा मुदत संपताच दंडासह एलबीटीची वसुली करण्याचा इशारा उपायुक्त अजय चारठाणकर यांनी बुधवारी दिला.

शासनाने सुरू केलेल्या अभय योजनेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित एलबीटीधारकांच्या कार्यशाळेत चारठाणकर बोलत होते. याप्रसंगी महापौर अभिषेक कळमकर, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, एलबीटी विभागप्रमुख दिनेश गांधी आदी उपस्थित होते. एलबीटीचे नोंदणीधारक, तसेच नोंदणी नसलेले व्यावसायिक, उशिरा भरणा करणारे, विवरणपत्र सादर करणारे अशा एलबीटीधारकांना अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी ३१ जुलै ही अंतमि मुदत आहे. योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी प्रशासनाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. परंतु एलबीटीधारकांनी कार्यशाळेकडे पाठ फिरवली. शहरात तब्बल हजार ५४० एलबीटीधारक असताना कार्यशाळेसाठी अवघे ६० ते ७० उपस्थित होते.

चारठाणकर म्हणाले, एलबीटी वसूल करण्याचा माझा अनुभव दांडगा आहे. एलबीटी धारकांसाठी अभय योजना फायद्याची आहे. योजनेचा दलिेल्या मुदतीत लाभ घ्या; अन्यथा दंडासह एलबीटी वसूल करण्यात येईल. शासनाने एलबीटी रद्द केला, तरी थकबाकीदारांकडून एलबीटी वसुलीचे काम सुरूच राहणार आहे.

महापौर कळमकर म्हणाले, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. वेळेत एलबीटी भरून प्रशासनाला सहकार्य करा.
बातम्या आणखी आहेत...