आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Blind Day And Assembly Elections News In Marathi

जागतिक अंधदिनी करा "डोळस'पणे मतदान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी (15 ऑक्टोबर) मतदान होत आहे. याेगायोगाची बाब म्हणजे याच दिवशी "जागतिक अंध दिवस' साजरा केला जातो. अंध दिनी निवडणूक आयोगाने मतदान घेऊन विधानसभेच्या पवित्र मंदिरात चांगल्या उमेदवाराला पाठवावे, यासाठी मतदारांनी "डोळस'पणे मतदान करावे, असाच संदेश दिला आहे.
निवडणूक आयोगाने 12 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. 20 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, पितृपक्षामुळे राजकीय पक्षांसह इच्छुकांनी अर्ज भरण्यास घटस्थापनेचा मुहूर्त निवडला. त्यातच युती, आघाडीत काडीमोड झाला. त्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. सर्वच उमेदवार व त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी मतदाराला गृहीत धरून आपल्याच पक्षाला बहुमत मिळेल, असा दावा केला. सोमवारी (13 ऑक्टोबर) जाहीर प्रचार संपला. जे 18 दिवसांपूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत होते, त्यांनी गेल्या 15 दिवसांत एकमेकांवर केलेली चिखलफेक मतदारांनी पाहिली. निवडणूक काळात पैशांचे, वस्तुंचे आमिष दाखवून मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळेच आयोगाने जागतिक अंध दिनी मतदान घेऊन मतदारांना डोळसपणे मतदानाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुक, व्हॉटस‌् अॅप या सोशल नेटवर्क साईटस‌्वरही डोळसपणे मतदानाचे आवाहन होत आहे.

लोक बेफिकीर राहिले, तर नुकसान होते...
फ्रेंच तत्त्वज्ञ माँटेस्कू यांनी म्हटले होते की, एखाद्या राजाचा जुलूमदेखील लोकशाहीतील नागरिकांच्या उदासीनतेइतका घातक नसतो. मतदार बेफिकीर राहिले, की त्यांच्या नशिबी वाईट सरकार येणे अपरिहार्य ठरते. म्हणून मतदारांनी ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न व दूरदृष्टी असलेल्यांना निवडावे.”
परमेश्वर लोहार, नागरिक, एमआयडीसी.
राज्याचे भवितव्य मतदारांच्या हाती
मतदारांची एक व्यापक संघटना उभारणे गरजेचे आहे. कोणाला मत द्यावे, यासंबंधी या संघटनेत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. ही संघटना राजकीय पक्षांशी संबंधित नसावी. राज्याचे भवितव्य आपल्या हाती आहे, याची जाणीव मतदारांना व्हायला हवी. ज्ञान, शूचिता यांना सार्वजनिक जीवनात पर्याय नसतो, हेही त्यांनी जाणून घेतले पाहिजे.”मुरलीधर टिंगरे, निवृत्त कनिष्ठ अभियंता