आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वारसा दिन : "बागरोजा'तील ऐतिहासिक कोड्यांचा उलगडा होईना...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्थापनेनंतर अवघ्या दोन-चार वर्षांत आपली राजधानी असलेल्या अहमदनगरला जगातील सर्वांत सुंदर अशा कैरो आणि बगदाद या शहरांच्या तोडीचे बनवणाऱ्या अहमद निजामशहाचा जन्म आणि मृत्यूची निश्चित तारीख (१५०८ की १५१०?)इतिहासात नोंदवलेली नाही. त्याचप्रमाणे हा बादशहा जिथे चिरविश्रांती घेत पहुडला आहे, त्या बागरोजाची काही कोडीही अजून उलगडलेली नाहीत.
बागरोजा या घुमटाकृती वास्तूत अहमदशहा त्याच्या पत्नीची कबर आहे. ही वास्तू बादशहाने आपल्या हयातीतच बांधून घेतली होती. सीना नदीकाठी तयार केलेल्या बागेत तटबंदीच्या आत ही चौरसाकृती वास्तू आहे. या वास्तूचा भव्य घुमट वैशिष्ट्यपूर्ण आहे. या घुमटाच्या आत पवित्र कुराणातील वचनं कोरण्यात आली आहेत. या ओळी अरबीतील "सुरह युसूफ' मधील आहेत. मात्र, त्या कुठून सुरू होतात कुठे संपतात हे सहजासहजी समजत नाही.

घुमटाला मध्यभागी गवाक्ष आहे. वास्तविक घुमटाच्या बांधकामाचे केंद्र म्हणजे ही जागा असते आणि त्यावरच संपूर्ण बांधकामाचा भक्कमपणा अवलंबून असतो. या गवाक्षातून माध्यान्हीची सूर्यकिरणे कबरीवर पडत असली, तरी गवाक्षाचा मूळ हेतू वेगळा असावा. (पानवर)

लढाईचे स्मारक

बागरोजाच्यातटबंदीबाहेर मेघडंबरी असलेली मोठ्या आकाराची कबर आहे. ही कबर सन १५६५ मध्ये झालेल्या तालिकोटच्या लढाईत हुसेन निजामशहाला विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेल्या गुलामअली हत्तीची आहे. मात्र, हा हत्ती कधी मेला, याची नोंद आढळत नाही. चौथऱ्यावरील माहूत त्याच्या पत्नीची कबर बादशहाच्या कबरीपेक्षाही देखणी आहे. हेही एक कोडंच आहे...