आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात लहान मराठी दिनदर्शिका...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दासनवमीचे (३ मार्च) औचित्य साधून येथील कलाकार अमोल बागूल यांनी जगातील सर्वात लहान मराठी दिनदर्शिका तयार केली आहे. 'समर्थांक' असे नाव असलेल्या या दिनदर्शित मराठी भाषा समर्थ रामदास स्वामींचे विचार देण्यात आले आहेत. ही कलाकृती लंडनच्या मॉर्ले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात जतन केली जाणार आहे. या दिनदर्शिकेचा आकार १.८ गुणिले १.५ सेंटीमीटर असून जाडी ०.५ मिलिमीटर आहे. तिचे वजन केवळ ७६५ मिलिग्रम आहे. या दिनदर्शिकेत १३ पाने असून १२ पानांवर बारा महिन्यांची माहिती देण्यात आली आहे. समर्थ स्थापित ११ मारूती, समर्थांचे पसायदान, समर्थांची आरती त्यांनी केलेला उपदेश आदींचा समावेश या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. सूक्ष्मदर्शकातून या साहित्याचे वाचन करता येते.