आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrestling News In Marathi, Wrestling At Wadiya Park In Nagar, Divya Marathi

वाडिया पार्कमध्ये घुमले मल्लांचे शड्डू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा तालिम संघ व कै. छबुराव लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा व जंगी निकाली कुस्ती मैदान पाहण्यासाठी राज्यभरातून आलेल्या कुस्तीप्रेमींनी वाडिया पार्कचे मैदान फुलले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही रात्री या कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली.
दुपारी चार वाजता मातीवरील कुस्त्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला अजित शेळके, विक्रम शेटे, भरत बोरुडे यांनी चित्तथरारक लढतीत विजय मिळवला. मुलींच्या कुस्तीमध्ये प्रतिभा नाना डोंगरे हिने विजय मिळवला. पन्नासहून अधिक कुस्त्या निकाली निघाल्या. संभाजी डोईफोडे व सुभाष वराळ यांची कुस्तीही चित्तथरारक झाली.
परदेशी मल्लांची हजेरी
25 लाखांची इनामी कुस्ती खेळण्यासाठी तुर्कस्तान, इराण, जॉजिर्यातील कुस्तीपटूंनी हजेरी लावली. यामध्ये इराणचा अली इमाम मोगली, तुर्कस्तानचा मोहम्मद इमीन, अब्दुल हमीद अल्तून, जॉजिर्याचा नाजमी कॅचुसिलर यांचा समावेश होता. उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार, राहुल आवारे, महेश वरुटे, योगेश पवार, गुलाब आगरकर, करमवीर सिंग हेही उपस्थित होते.
(मातीवरील कुस्ती लावताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. समवेत आमदार अरुण जगताप, वैभव लांडगे व इतर).