आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्यिकांनी वास्तव मांडावे: वसंत डहाके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- प्रवरा परिसरात व देशात सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून झालेल्या बदलांवर कथा, कादंब-या निर्माण व्हायला हव्यात. कोणत्याही क्षेत्रात काम करणा-यांनी मनात काही न ठेवता ते व्यक्त केले पाहिजे. साहित्य अधिक समृद्ध होण्यासाठी साहित्यिकांनी वास्तव मांडावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत डहाके यांनी केले.
डॉ. विखे यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त आयोजित साहित्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक लक्ष्मण माने होते. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, अण्णासाहेब म्हस्के, जयंत ससाणे, शालिनीताई विखे, प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. भास्करराव खर्डे, तुकाराम बेंदे्र, एम. एम. पलाटे आदी यावेळी उपस्थित होते. पद्मश्री डॉ. विखे साहित्य पुरस्कार अरुण साधू लिखित पद्मश्री विखे यांच्या ‘पायोनियर’ या इंग्रजी चरित्र ग्रंथास (25 हजार व स्मृतिचिन्ह) व एकनाथ आवाड यांच्या ‘जग बदल घालूनी घाव’ या पुस्तकास देण्यात आला. साधू यांना 50 हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन ‘जीवन गौरव पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले.
निवृत्ती महाराज इंदोरीकर ‘पद्मश्री विखे प्रबोधन पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. ‘जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ डॉ. राजेंद्र वडकारे यांच्या ‘महामेरु’ या कादंबरीस देण्यात आला. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांना ‘साहित्य सेवा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. नवाब पटेल यांच्या ‘राँग नंबर’ गं्रथास उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.