आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ya Gol Gol Dabyat Marathi Film Release In Maharashtra

‘या गोल गोल डब्यातला’ होणार शुक्रवारी प्रदर्शित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अशोक सराफ, स्मिता तळवलकर, संतोष जुवेकर, स्मिता शेवाळे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘या गोल गोल डब्यातला’ हा चित्रपट शुक्रवारी (20 जानेवारी) महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आसित रेडीज यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रेडिया यांचा राज्यभर दौरा सुरू आहे. रविवारी ते नगरला आले होते. ते म्हणाले, ‘‘वडील व मुलगा यांच्यातील म्हणजेच दोन पिढ्यांतील वैचारिक संघर्षाची ही कथा आहे. यातील वडील लाकडी खोक्यातील सिनेमा दाखवण्याचा व्यवसाय करीत असतात. मुलगा त्यांच्याबरोबरच फिरत असतो. कालांतराने मुलगा मोठा होऊन कलावंत होतो, पण त्याची बिजे वडिलांच्या व्यवसायात असतात, हे तो विसरून जातो. आई-वडिलांनाही तो विसरतो.’’‘‘हे सर्व दाखवत असताना त्यातील कायदेशीर बाजूही समोर आणल्या आहेत. मुलाकडून आई-वडिलांना पोटगी मिळू शकते, हे 95 टक्के लोकांना माहिती नसते. ही पोटगी जेमतेम पाच हजार रुपयापर्यंतच असते. वार्धक्यात मोठा आजार झाला तर काय, या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटात शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट कसा स्वीकारला जाईल हे माहिती नाही, पण विषयाशी प्रामाणिक राहिलो आहे,’’ असे रेडीज म्हणाले.