आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशवंतराव हे महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल; ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या विकासाचे एक मॉडेल होते. ते कमी काळ मुख्यमंत्री होते. तथापि, त्यांच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. शिक्षणाला त्यांनी मोठे महत्त्व दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी शनिवारी केेले. 


जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण व्यासपीठच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त अायोजित व्याख्यानमालेत डॉ. सप्तर्षी बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यासपीठचे अध्यक्ष रामनाथ वाघ होते. माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, रा. ह. दरे, राजेंद्र निंबाळकर, पोपटराव काळे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांना वकिलीच्या शिक्षणासाठी जमीन विकावी लागली होती. जसे मोदी एक मॉडेल आहेत, तसेच महाराष्ट्राच्या विकासाचे यशवंतराव चव्हाण हे एक मॉडेल आहे. ते जर नसते, तर रयत शिक्षण संस्था टिकली असती का? असा सवाल करून यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षणाला मोठे महत्त्व दिले. ग्रामीण भागात शिक्षणाचा रथ नेण्याचे काम त्यांनी केले, असे डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले. शिक्षणासाठी हाल झाले म्हणून यशवंतराव चव्हाण यांना शिक्षणाचे महत्त्व कळले. त्यांना वाचनाची मोठी आवड होती. 


मराठा समाज सध्या ‘वावर’ आणि ‘पाॅवर’ यात अडकला आहे. या पलीकडे मराठा समाजातील युवक पाहण्यास तयार नाहीत. मोदींविषयी सोशल मीडियात राग आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले, महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा केंद्र ही एक प्रकारची इंडस्ट्रीच झाली आहे. यशवंतराव चव्हाणांनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षणासाठी मोठे काम उभे केले, असेह ते म्हणाले. 


वाघ म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. महाराष्ट्र त्यांनी सुसंस्कृत बनवला. चांगल्या प्रकारचा कारभार करून त्यांनी नावलौकिक मिळवला. प्रास्ताविक करताना प्रा. शितोळे म्हणाले, विचारांची लढाई ही विचारानेच लढली गेली पाहिजे. यशवंतराव चव्हाण चांगल्या विचारांचे पाईक होते. त्यांची विचारधारा तीक्ष्ण होती, असे त्यांनी सांगितले. 


मतदान विकणारी लोकशाही घातक 
ज्यांनाअापण देव मानतो, त्यांच्या हातात हिंस्त्र शस्त्र का असतात? असा प्रश्न डॉ. कुमार सप्तर्षी यांनी उपस्थित करून पूर्वी हिंदू हा धर्म नव्हता, संप्रदाय होता, असे सांगितले. चांगले लोक निवडून येत नाहीत, म्हणून बदमाशाला पाडण्यासाठी दोन-चार हजार मते पाहिजे असतात. जे निवडणुकीत मते विकतात, ते लोकशाहीसाठी घातक ठरत असतात, असेही त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...