आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली माझी ओवी, ओंकाराच्या बीजाला...योगाचे महत्त्व वर्णन करणाऱ्या योग गीतमाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग गीतमाला कार्यक्रमात गाणी सादर करताना श्रुती संगीत निकेतनचे कलावंत. - Divya Marathi
योग गीतमाला कार्यक्रमात गाणी सादर करताना श्रुती संगीत निकेतनचे कलावंत.
नगर- जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून योग विद्या धाम श्रुती संगीत निकेतनतर्फे रावसाहेब पटवर्धन सभागृहात योगाचे महत्त्व वर्णन करणाऱ्या योग गीतमाला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून भारतीय योग विद्या गुरुकुलचे अध्यक्ष श्रीकांत चिटणीस उपस्थित होते. 
 
‘ओंकार अनादी अनंत अथांग अपरंपार’ या दीप्ती खरंवडीकर हिने गायलेल्या ओंकार गीताने या मैफलीला प्रारंभ झाला. वैशाली एकबोटे, श्रुती फडके यांनी ‘पहिली माझी ओवी, ओंकाराच्या बीजाला’ योगाच्या ओव्या गायल्या. लोकगीताचा बाज रसिकांना भावला. ‘कशाला करू मी योगाभ्यास’ हे भारूड चेतना नवले यांनी सादर केले. वृषाली गायकैवारी, मानसी शिवस्वरूप हिने ‘आत्मषटक’ म्हटले. माधवी ऋषी यांनी ‘योग हा सूर दे’ हा योग तराणा सादर केला. गिरिजा चांदेकर ‘सुरस सुबोधा नैव क्लिष्टां नचं कठिणां’ जयश्री मोरे यांनी ‘योगाचा जोगवा मागते हा जोगवा’ हा योगाचा जोगवा मागत सर्वांना निरोगी ठेवण्याची प्रार्थना केली. मीरा शर्मा ‘मुक्त खुल्या मनाने, गाऽ गाऽऽ गाऽऽऽ योग गीत गा’ हे गीत गात सर्वांना गायनात सामील करुन घेतले. श्रीकांत चिटणीस’ दिशा दिशातून नाद निनादे’ हे ‘बी योगी’ हे इंग्रजी गीत गायले. वैशाली एकबोटे, दत्ता दिकोंडा यांनी लावणी सादर केली. ‘आम्ही योगाचे गोंधळी ’हे योगाचे गीतही उपस्थितांना भावले. 

अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे नाट्याभिनयाबद्दल कला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मीरा महाजनी यांचा, विद्या वाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल पेमराज सारडा महाविद्यालयातील मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सुजीत कुमावत यांचा नाशिकच्या योग विद्या गुरुकुल येथे व्याख्यान देण्याचा पहिला बहुमान नगर शाखेच्या श्रद्धा परदेशी यांनी प्राप्त केला, त्याबद्दल या सर्व योग शिक्षकांचा चिटणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 
 
सहज ओठावर रुळणारी गाणी 
भावगीत, भक्तिगीत, समरगीत, शौर्यगीत, नाट्यगीत असे संगीताचे अनेक प्रकार आहेत. याच धर्तीवर अष्टांग योग, प्राणायाम, शुद्धिक्रिया यातून येणारी अनुभूती, योगाचे महत्त्व, योगाची सुलभता अशा विविध विषयांना स्पर्श करणारी ही गीते सहज ओठावर रुळणारी आहेत. योगाभ्यासावर आधारलेली गीतांचे लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न डॉ. विश्वास मंडलिक सहकाऱ्यांनी केला. या गीतांच्या मैफलींना रसिकांचा प्रतिसाद मिळतो. इतकेच नव्हे, तर याआधी राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या योगगीत स्पर्धांनाही राज्यभरातून गायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी आठवण चिटणीस यांनी सांगितली. 
बातम्या आणखी आहेत...