आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दम्य इच्छाशक्ती हाच ध्येयप्राप्तीचा सर्वोत्तम राजमार्ग - परमवीरचक्र विजेता योगेंद्रसिंग यादव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दुर्दम्य इच्छाशक्ती हाच ध्येयप्राप्तीचा सर्वोत्तम राजमार्ग आहे, असे भारतीय लष्करातील सर्वात कमी वयाचे परमवीरचक्र विजेते योगेंद्रसिंग यादव यांनी तरुणाईशी संवाद साधताना सांगितले.

स्नेहालय संस्थेत आयोजित १६ व्या युवा प्रेरणा शिबिरात यादव बोलत होते. उपस्थित ३०० शिबिरार्थी मंत्रमुग्ध होऊन त्यांची संघर्षगाथा एेकत होते. साहसी आणि देशभक्त तरुणाईसाठी हे विशेष युवा प्रेरणा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात समर्पित योगदान देणाऱ्या आणि ५७, महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियनचे िनवृत्त मेजर असलेल्या िदनुभाऊ कुलकर्णी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ संस्थेने या उपक्रमात सहभाग दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लष्कराच्या आर्मर्ड कोअरचे कर्नल महेंद्रसिंग होते.

१६ हजार ५०० फूट उंचीवर हिमालयातील टायगर हिल भागात घुसून भारताच्या भूभागाचा ताबा घेतलेल्या पाकिस्तानी सैन्याला सरहद्दीबाहेर हाकलण्यासाठी माझ्या १८, ग्रॅनेडिअर िवभागातील आत्मघाती तुकडीने तब्बल ७२ तास हिमवादळांना तोंड देत चढाई केली. घनघोर लढाईत आमच्या तुकडीतील बहुतेकजण शहीद झाले. माझ्याही शरीराची गोळ्यांनी चाळण झाली होती, पण मी िजवंत होतो. पाकिस्तानी सैन्याने प्रत्येक मृतदेहावर गोळ्या झाडून भारतीय सैनिक ठार असल्याची खात्री केली. अर्धवट ग्लानीत असताना मलाही गोळ्या घातल्या. सुदैवाने १७ पैकी एकही गोळी माझ्या मेंदू आणि हृदयात लागली नाही. त्याही अवस्थेत मी बॉम्ब अचूक फेकला. त्यात ६ पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

कर्मवीरांनी साधला संवाद
काश्मीर खऱ्यात अतिरेक्यांनी उदध्वस्त केलेल्या परिवारातील मुलींचे पुनर्वसन करणारे आदिक कदम, फासेपारधी समाजातील बालकांचे पुनर्वसन करणारे श्रीगोंद्याचे अनंत झेंडे, सार्थक प्रकल्पात बेघर बालकांचे पुनर्वसन करणारे nagar zp meeting issue . अनिल कुडिया (पुणे), भारतभर सायकलवर भ्रमण करणारे हिरालाल यादव, भटक्या वि‍मुक्त समाजासाठी बालगृह चालवणारे फारूक बेग अशा अनेकांनी या तरुणाईशी संवाद केला. हृदयविकाराची पूर्वसूचना देणारे तंत्र शोधणारे डॉ. निखिल विलास जोशी आणि गुगल कंपनीतर्फे सेवाकार्यात तांत्रिकक सहयोग देणाऱ्या पूजा जैस्वाल, िकरण डोडी हे विशेष पाहुणे म्हणून या शिबिरास उपस्थित होते.